RSS साजरा करणार ‘आंतरराष्ट्रीय ईद मिलन उत्सव’; मुस्लिम देशाचे राजदूत होणार सहभागी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा असलेला मुस्लिम राष्ट्रीय मंच उद्या दिनांक १२ जून रोजी आंतरराष्ट्रीय ईद मिलन उत्सव साजरा करणारा आहे. संसदेच्या एनेक्सी हॉलमध्ये हा उत्सव साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमात मुस्लिम देशाचे राजदूत तसेच राजकीय पक्षाचे नेते आणि अनेक धर्माचे प्रमुख प्रतिनिधी सहभागी होण्याची शक्यता आहे.

या कार्यक्रमात भाजपच्या प्रमुख नेत्यांसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख नेते सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुस्लिमांसोबत बंधुत्वाची भावना वाढवू इच्छित आहे.

मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे संरक्षक इंद्रेश कुमार यांनी या कार्यक्रमाची माहिती देताना सांगितले की, इस्लाम पूर्ण जगात शांती नांदावी यासाठी संदेश देतो. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश इस्लाम धर्माचा मूळ उद्देश लोकांच्या समोर आणणे हा आहे. इंद्रेशकुमार यांनी सांगितले की, मुस्लिम राष्ट्रीय मंच हा कार्यक्रम अनेक वर्षांपासून करत आला आहे.

आरोग्यविषयक वृत्त (www.arogyanama.com)

 श्वसनाचे आजार दूर करण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय

अहंकार आणि भीती दूर करण्याचे प्रभावी साधन ‘योगा ‘

सेक्स शरीरासाठी आवश्यक, पहा तज्ज्ञ काय सांगतात

‘दारू’ आणि ‘पेनकिलर’ एकत्र घेणे धोकादायक !