RSS कार्यकर्त्यासह त्याच्या गरोदर पत्नी आणि मुलाचा निर्घृण खून

मुर्शिदाबाद : वृत्तसंस्था – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते बंधू गोपाल पाल यांचा काही अज्ञातांनी खून केला आहे. बंधू गोपाल पाल यांच्यासह त्यांची पत्नी ब्यूटी पाल आणि त्याचा सहा वर्षाचा मुलगा अंगण पाल यांचाही खून करण्यात आला आहे. ब्युटी पाल या आठ महिन्याच्या गरोदर होत्या. ही घटना पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद येथे घडली.

या घटनेचा व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर घटनेची माहिती समजली. एकाच वेळी तिघांचा खून झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता संबित पात्रा यांनी घटनेची निंदा करत राज्यात सामान्य नागरिक सुरक्षित आहे का ? असा सवाल उपस्थित केला आहे. बंधू गोपाल पाल हे जियागंज परिसरातील एका प्राथमिक विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होते. मंगळवारी त्यांचा, त्यांची पत्नी आणि मुलाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात त्यांच्या घरामध्ये आढळून आला. हा खून कोणी आणि कोणत्या कारणामुळे केला हे अद्याप समजू शकले नसून पोलीस शोध घेत आहेत.

बंधू गोपाल पाल, पत्नी ब्यूटी पाल आणि मुलगा यांचा भोसकून खून करण्यात आला. तसेच मुलगा अंगण पाल याचा गळा दाबण्यात आला. मुर्शिदाबादचे भाजप उपाध्यक्ष हुमायून कबीर यांनी सांगितले की, पाल हे आरएसएस सदस्य होते. मात्र, त्यांच्या खूनाशी राजकीय संबंध नाही. या घटनेचे वृत्त समोर आल्यानंतर नेटीझन्सकडून याचा निषेध आणि संताप व्यक्त केला जात आहे. त्याच पार्श्वभूमिवर ट्विटरवर सध्या #Murshidabad हा ट्रेंड सुरु झाला आहे.

visit : policenama.com