home page top 1

‘बाप-लेका’कडून RSS कार्यकर्त्याची हत्या, पोलिसांसमोर केला गुन्हा कबूल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेश मधील मुजफ्फरनगर येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वडिलांनी आणि मुलाने मिळून एका आर एस एसच्या कार्यकर्त्याची हत्या केली आहे. हत्या करताच दोघांनी पोलिसांसमोर जाऊन सर्व प्रकार सांगितलं. हत्या केलेला कार्यकर्ता हा त्यांच्या घरातील मुलीला त्रास देत होता असे वडिलांनी पोलिसांना दिलेल्या माहित सांगितले आहे.

पंकज असे मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव असून पंकजने त्याच ठिकाणाहून आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे. वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार पंकज हा अनेकदा त्यांच्या मुलीला त्रास देत होता आणि अनेकदा सांगूनही त्याने ऐकले नव्हते. पंकजा हा परिसरात आर एस एसचे कार्य करत होता.

आरोपींनी स्वतः दिली गुन्ह्याची कबुली –

मुजफ्फरनगरच्या एस एस पी अभिषेक यादव यांनी सांगितले की, वडील आणि मुलाने आपला गुन्हा अबुल केला आहे आणि मृत व्यक्तीची डेडबॉडी जंगलात सापडली आहे.पंकज त्या दिवशी आपल्या सोनू नावाच्या मित्रासोबत चालला होता अचानक त्याला एक फोन आला आणि त्याने मित्राला पुढे जाण्यास सांगितले.

पंकज रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने त्याच्या घरच्यांनी पोलिसांत तक्रार केली त्यानंतर तपास करताना सोनुने पंकजा घ्या जागेवर सोडले होते त्या ठिकाणी पोलिसांनी तपासणी केली असता रक्ताचे काही डाग त्यांना आढळून आले त्यानंतर जवळच्याच जंगलात पंकजची डेड बॉडीसुद्धा सापडली.

Loading...
You might also like