RSS मुळेच ईशान्येकडील राज्य भारतात : सरसंघचालक मोहन भागवत

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळे (आरएसएस) ईशान्येकडील राज्य आज भारतात आहेत. ईशान्येकडील राज्यात संघाच्या स्वयंसेवकांनी केलेल्या कार्यांमुळे परिस्थिती बदलली आहे. असा दावा सरसंघचालक मोहन भागवत यांनी केला आहे. ‘शुभारंभ’ या कादंबरीच्या प्रकाशन सोहळ्यात त्यांनी हे विधान केले आहे.

अरुणाचल प्रदेशातील परिस्थितीवर एका स्वयंसेवकाने शुभारंभ ही कादंबरी लिहली आहे. या कादंबरीच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना मोहन भागवत म्हणाले की, ‘काही वर्षांपूर्वीपर्यंत ईशान्येकडील राज्ये भारतापासून वेगळे होतील, आसामचे काश्मीर होईल, अशी भीती व्यक्त केली जात होती. ईशान्येकडील राज्यात संघाच्या स्वयंसेवकांनी केलेल्या कार्यांमुळे परिस्थिती बदलली आहे. 50 वर्षांपूर्वी स्वयंसेवकांनी तिथे जाऊन सेवाकार्य सुरु केले आणि आजही ते सुरु आहे. त्यामुळे ही परिस्थिती बदलणे शक्य झाले आहे. तिथले लोक भारतात राहू इच्छितात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळे ईशान्येकडील राज्य आज भारतात आहेत. परिस्थिती बदलून आज अरुणाचल प्रदेशात भारताच्या पक्षात आणि चीनच्या विरोधात मोर्चे काढले जात आहेत. 50 वर्षांपूर्वी आपुलकीच्या भावनेतून आणि स्वयंप्रेरणेतून सुरु झालेले कार्य आजही अविरतपणे सुरु आहे.

ईशान्येकडील राज्यातील लोकांविषयी बोलताना भागवत म्हणाले की, ‘ईशान्येकडील राज्यातून लोक दिल्लीत येतात, तेव्हा काही लोक त्यांना चीनचे असल्याचे संबोधतो. त्यांना परके मानतो, ही आपली चूक आहे. देशातील नागरिकांनी ईशान्यकडील लोकांबद्दलचा दुरावा दूर केला पाहिजे. त्यातून समस्या सुटतील.’

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like