3 दिवसानंतर 24 तास मिळणार बँकेची ‘ही’ सर्व्हिस, घरबसल्या जलदगतीने पाठवू शकता पैसे

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   कोरोना व्हायरससाठी लावलेल्या लॉकडाऊन दरम्यानच देशभरात डिजिटल ट्रांजक्शनला बूस्ट मिळाला आहे. घरातून बाहेर पडणे टाळण्यासाठी आणि संसर्गापासून वाचण्यासाठी बहुतांश लोक ऑनलाइन पेमेंटचा आधार घेत आहेत. हे पहाता भारतीय रिझर्व्ह बँकेने आता ऑनलाइन ट्रांजक्शनची सुविधा आणखी सोपी करण्याचा निर्णय घेतला आहे. देशात रियल टाइम ग्रोस सेटलमेंट सिस्टम म्हणजे RTGS (Real Time Gross Settlement System) ची सुविधा 14 डिसेंबरपासून रोज 24 तास करणार आहे. यानंतर भारत त्या निवडक देशांमध्ये सहभागी होईल, जिथे ही सुविधा रात्रंदिवस काम करते.

2004 मध्ये तीन बँकांसाठी सुरू झाली होती आरटीजीएस सुविधा

रिझर्व्ह बँकेनुसार, 14 डिसेंबरला 00:30 वाजता म्हणजे मध्यरात्री 12:30 वाजतापासून आरटीजीएस सर्व्हिस 24 तास उपलब्ध असेल. 16 वर्षांपूर्वी मार्च 2004 मध्ये केवळ 3 बँकांसोबत आरटीजीएस सर्व्हिसची सुरूवात करण्यात आली होती आणि आता या सर्व्हिसशी 237 बँका जोडल्या गेल्या आहेत. आरटीजीएसद्वारे तुम्ही बँकेच्या ब्रँचमध्ये जाऊन किंवा घरी बसून तत्काळ पैसे ट्रान्सफर करू शकता.

द्यावे लागणार नाही फंड ट्रान्सफर शुल्क

आरटीजीएस मोठ्या ट्रांजक्शनसाठी उपयोगी येते. आरटीजीएसद्वारे 2 लाख रुपयांपेक्षा कमी रक्कम ट्रान्सफर करता येत नाही. हे ऑनलाइन आणि बँक ब्रँच दोन्ही ठिकाणी करता येते. यामध्ये ऑनलाइनसाठी शुल्क नाही, पण ब्रँचमध्ये जाऊन आरटीजीएस केल्यास शुल्क द्यावे लागेल.

एका बँकेतून दुसर्‍या बँकेच्या अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यासाठी सर्व पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये सर्वात जास्त पॉप्युलर आरटीजीएस, एनईएफटी आणि आएमपीएस आहे. यापूर्वी मागच्या वर्षी डिसेंबरमध्येच शनिवार, रविवार वगळता कामकाजाच्या दिवशी रोज काही तास ही सेवा सुरू करण्यात आली होती. आरटीजीएस पैसे ट्रान्सफर करण्याची सर्वात वेगवान सर्व्हिस आहे. एनईएफटीने पैसे पाठवल्यानंतर के्रडिट होण्यास थोडा वेळ लागतो, परंतु आरटीजीएसने ताबडतोब पैसे पोहचतात.