RTI कार्यकर्त्याच्या हत्याप्रकरणी पोलिसांनी ‘क्लीन चीट’ दिलेल्या भाजपच्या माजी खासदारासह ७ जणांना जन्मठेप

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन –  माहिती अधिकार कार्यकर्ते अमित जेठवा यांच्या हत्येप्रकरणी माजी भाजप खासदार दीनू बोघा सोलंकी यांच्यासमवेत सात जणांना न्यायालयाने आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. त्याचबरोबर दीनू बोघा सोलंकी आणि त्याचा पुतण्या शिवा सोलंकी या दोघांना प्रत्येकी १५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. याआधी शनिवारी अहमदाबादच्या सीबीआई कोर्टाने या सर्वांना हत्या आणि हत्येचा कट रचल्याप्रकरणी दोषी ठरवले होते.

२० जुलै २०१० रोजी गुजरात हायकोर्टाच्या समोर अमित जेठवा यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. गुजरात पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने या प्रकरणात दीनू बोघा सोलंकी यांना क्लीन चिट दिली होती. त्यानंतर जेठवा यांच्या वडिलांनी या प्रकरणात हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यानंतर हायकोर्टाने या प्रकरणाचा तपास सीबीआय कडे सोपवला होता. सीबीआयच्या तपासात या सातही जणांना दोषी ठरवण्यात आल्यानंतर आज अखेर त्यांना या प्रकरणात शिक्षा ठोठावण्यात आली.

दरम्यान, दीनू बोघा सोलंकी हे २००९ ते २०१४ या काळात भाजपचे जुनागढ लोकसभा मतदारसंघातून खासदार होते. 

‘ही’ पथ्ये पाळून थायरॉईड अगदी ‘कंट्रोल’मध्ये आणा

‘कोथिंबीर’चं सेवन डोळयांसाठी अत्यंत फायदेमंद, जाणून घ्या

दातांच्या समस्येवर करा  ‘हे’ घरगुती उपाय

बीट खाल्याचे ‘हे’ चमत्कारिक फायदे ; ‘खुंटते कॅन्सरग्रस्त कोशिकांची वृध्दी’, जाणून घ्या

लहान मुलांना दुधीदात येत असताना होणाऱ्या त्रासावर करा ‘हे’ ५ उपाय