PM नरेंद्र मोदींकडे आहेत का नागरिकत्वाचे पुरावे ? यावर PMO नं दिले ‘हे’ उत्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या देशात नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसी वरून चांगलेच राजकारण सुरु आहे. शाहीन बागेसह पूर्ण देशभरात याविरुद्ध आंदोलने सुरु आहेत. एनआरसी लागू झाल्यास आपले भारताचे नागरिकत्व जाईल अशी अनेकांना भीती आहे, यावरून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे नागरिकत्व असल्याचे पुरावे मागितले गेले होते. नरेंद्र मोदींचा जन्म भारतातच झाल्यामुळे त्यांना नागरिकत्व सिद्ध करण्याची काहीही गरज नाही असे उत्तर पीएमओ कार्यालयाने दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माहिती अधिकाराच्या माध्यमातून शुभांकर सरकार यांनी ही माहिती मागितली होती. त्यांनी माहिती अधिकाराच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नागरिकत्वाबद्दलचे तपशील मागितले होते. पंतप्रधान मोदी हे नागरिकत्व कायदा १९५५ च्या कलम ३ च्या अंतर्गत जन्माने भारतीय असल्यामुळे त्यांना नागरिकत्वाचे दाखले देण्याचा प्रश्नच येत नाही असे उत्तर पीएमओने दिले आहे.