RTI मध्ये खुलासा ! RBI ने घोटाळ्यात अडकलेल्या PMC बँकेला 2014 पासून एकही नोटीस पाठवली नव्हती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय रिझर्व बँकेला (RBI) 4,300 कोटी रुपयांचा पीएमसी बँक घोटाळा आणि रिअ‍ॅलिटी सेक्‍टर कंपनी एचडीआयएल (HDIL) दिवाळखोर होण्याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले जात आहे. एका आरटीआयला उत्तर देताना आरबीआयने सांगितले की, याबाबत त्यांना सप्टेंबर 2019 मध्ये करण्यात आलेल्या तक्रारीनंतर माहिती मिळाली. तसेच आरबीआयने पंजाब आणि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेला 2014 पासून कोणतीच नोटीस किंवा चेतावणी दिली गेली नसल्याचे देखील सांगितले. या घोटाळ्यामुळे सहा राज्यातील 15 लाख ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

दंडाचा आदेश आणि नोटीस प्रक्रिया करू शकली नाही आरबीआय
2014 च्या आधीचे सर्व रेकॉर्ड आरबीआयकडून नष्ट करण्यात आलेले आहेत. एका वृत्तवाहिनीने याबाबत आरटीआय दाखल करत याबाबत दंडाचा आदेश आणि माहिती मागितली होती. त्यावर उत्तर देताना आरबीआयने सांगितले की, 31 मार्च 2019 च्या आर्थिक वर्षाचा तपास अहवाल सध्या तयार केला जात असल्याचे सांगितले आहे. 2015 ते 2018 च्या दरम्यान पीएमसी बँकेबाबत देखील विचारण्यात आले आहे.

आरबीआयने तपास अधिकाऱ्यांची नावे सांगण्यास दिला नकार
आरबीआयने 2014 ते 2018 मध्ये झालेल्या घोटाळ्यांचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांची माहिती देण्यास साफ नकार दिला आहे. तसेच एप्रिल 2014 च्या आधीची माहिती उपलब्ध नसल्याचे बँकेने सांगितले आहे. तसेच आरबीआयला 2019 च्या आधी कोणत्याही प्रकारची देवाण घेवाण करताना तक्रार आलेली नसल्याचे सांगितले.

पीएमसी बँक आणि एचडीआयएलच्या अनेक अधिकाऱ्यांना केली अटक
23 सप्टेंबर 2019 रोजी बहु-राज्‍यीय को-ऑपरेटिव बँकांवर अनेक निर्बंध लावण्यात आले. तपासात एचडीआयएलने अनेक संशयित खात्यांवरून कर्ज घेतल्याचे आढळून आले. यानंतर आरबीआयने पीएमसी बँकेच्या बोर्डाला बरखास्त केले आणि एका प्रशासकीय अधिकाऱ्याची नियुक्ती केली. याबाबतचा अधिक तपास ईडीमार्फत केला जात आहे. याबाबत अनेक अधिकाऱ्यांची चौकशी आणि अटक करण्यात आलेली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/