RTO ने माझी गाडी विकून ‘खाल्‍ली’, मालकाचा ‘गंभीर’ आरोप

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आपली चोरी झालेली वस्तू एखाद्याने विकण्याचे प्रकार सर्रास घडत असतात. यामध्ये गाडी असो किंवा आपली संपत्ती असो, अनेकवेळा आपली फसवणूक करून परस्पर या वस्तूंची तसेच मालमत्तेची विक्री केली जाते. मात्र पुण्यामध्ये चक्क आरटीओनी गाडी विकल्याची घटना घडली आहे. एका चारचाकी गाडीची त्याच्या मालकाच्या परवानगीशिवाय विक्री केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी गाडी मालकाने थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना ट्विटरवरून प्रश्न विचारला आहे.

राजगुरूनगर येथे राहणाऱ्या, सचिन गव्हाणे यांच्या टेम्पोची परस्पर विक्री केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी माहिती अशी कि, त्यांनी हा टेम्पो विकत घेतला होता. त्यानंतर तो टेम्पो त्यांनी भावाला चालवण्यासाठी दिला होता. मात्र भावाने त्यांच्या टेम्पो परस्पर विकला आणि पोबारा केला. मात्र नंतर त्यांच्या हे लक्षात येताच त्यांना या प्रकरणाची चौकशी करताना धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांनी या प्रकरणाची माहिती घेतली असता त्यामध्ये परिवहन विभागातील अधिकारी आणि दलालांनी संगनमत करून या टेम्पोची विक्री केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. मात्र तक्रार करून देखील त्यांच्या प्रकरणाची कुणीही दाखल घेतली नाही. अखेर त्यांनी संतापून अधिकाऱ्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी चौकशी सुरु असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना ट्विटरवरून प्रश्न विचारला. सचिन गव्हाणे यांनी तब्बल 3 हजार ट्विट करत हा प्रश्न उपस्थित केला. मात्र एकदाही त्यांच्या ट्विटची दखल घेण्यात आली नाही.

दरम्यान, एका बाजूला वाहनचालकांकडून भरमसाठ दंड वसूल केला जात असताना दुसऱ्या बाजूला सामान्य नागरिकांच्या तक्रारींकडे परिवहन विभाग लक्ष देत नसल्याने सामान्य नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

 

You might also like