Rubina Dilaik | साईड कट गाऊनमध्ये रुबीना दिलैकने दाखवली किलर स्टाईल; अभिनेत्रीच्या ग्लॅमरस अवतारने चाहते घायाळ

0
151
File Photo
File photo

पोलीसनामा ऑनलाइन टीम : अभिनेत्री रुबीना दिलैक (Rubina Dilaik) २००८ मध्ये आलेल्या ‘छोटी बहू’ या मालिकेमधून इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवले होते. त्यानंतर तिने तिच्या अभिनयाने सर्वांनाच वेड लावले. रुबीना सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. सध्या रुबीना तिच्या लूकमुळे चर्चेत आहे. रुबीना नेहमीच तिच्या विविध स्टाईल मधील फोटोज सोशल मीडियावर शेअर करत असते. रुबीनाच्या या फोटोजने सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेतल्याचे दिसत आहे. रुबीनाने (Rubina Dilaik) तिच्या इंस्टाग्राम वर काही नवीन फोटो शेअर केले आहेत. जे पाहून चाहते घायाळ झाल्याचे दिसत आहे.

सध्या रुबीनाची रोज एक नवीन स्टाईल पाहायला मिळत आहे. या स्टाईलने ती सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. रुबीना तिच्या हॉट लूकमुळे चर्चेत असते. रुबीनाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने मखमली थाई हाय स्लिट गाऊन, वन शोल्डर गाऊन घातला आहे. ज्यामध्ये वरच्या बाजूला हेवे एम्ब्रॉयडरी वर्क केल्याचे दिसत आहे. रुबियाने तिचा हा लूक वेगळ्याच पद्धतीने कॅरी केल्याचे दिसून येत आहे. यावेळी रुबीनाने केसांचा बन करत हेवी मेकअप करत डोळे स्मोकी केले आहेत. सध्या रुबीनाचा हा नवा लूक सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

या लुक मध्ये रुबीना (Rubina Dilaik) खूपच हॉट आणि सुंदर दिसत आहे. तर तिच्या या नव्या लुकला चाहत्यांनी देखील भरभरून प्रेम केले आहे. चाहत्यांसोबतच अभिनेत्रीच्या या फोटोवर अनेक सेलिब्रिटींनी देखील कमेंट करत तिचे कौतुक केले आहे. तर रुबीनाचा हा नवा लूक चाहत्यांमध्ये चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. रुबीनाच्या या फोटोवर अनेकांनी हार्ट आणि फायर इमोजी शेअर करत कमेंट बॉक्स फुल केले आहे.

 

 

Web Title :- Rubina Dilaik | rubina dilaik shared new look in side cut gown take a look

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Mumbai Crime | धक्कादायक ! एका शुल्लक कारणावरून डिलिव्हरी बॉयची निर्घृणपणे हत्या

Janhvi Kapoor | जान्हवी कपूरच्या नव्या फोटोने वेधले लक्ष; नथ परिधान करत केले चाहत्यांना घायाळ

Pune Bypoll Elections | पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची भाजपची मागणी अजित पवारांनी धुडकावली, महाविकास आघाडी निवडणूक लढवणार; अजित पवारांनी केलं स्पष्ट

Tejasswi Prakash | अभिनेत्री तेजस्वीचे ब्लॅक शिमरी ड्रेसमधील फोटो व्हायरल

BMC Corruption | भ्रष्टाचार प्रकरणी मुंबई महापालिकेची मोठी कारवाई; विविध गुन्हे सिध्द झालेले 55 जण बडतर्फ तर 53 कर्मचारी निलंबीत