‘या’ कंपनीच्या शेअर्संनी दिले 6 महिन्यात तब्बल 39120 % रिटर्न, पतंजलीनं गेल्यावर्षी केलं होतं ‘टेकओव्हर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – २४ जानेवारी २०२० रोजी ज्या कंपनीच्या शेअरची किंमत प्रति शेअर ३.३२ रुपये होती, ती आज १३६७.२० रुपये व्यापार करत आहे. या कंपनीचे अधिग्रहण बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीने गेल्या वर्षीच पूर्ण केले होते. ही कंपनी रुची सोया आहे.

डिसेंबर २०१९ पासून आतापर्यंत दिला ३९,११९.८८ टक्के रिटर्न
या कंपनीचे शेअर्स खरेदी करणारे गुंतवणूकदार भाग्यवान असतील. १८ डिसेंबर २०१९ ते २३ जून २०२० पर्यंत रुची सोयाच्या शेअरने ३९,११९.८८ टक्के परतावा गुंतवणूकदारांना दिला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून त्यांचे शेअर्स सतत अप्पर सर्किटमध्ये सुरू आहेत. स्मॉल कॅप श्रेणीतील या कंपनीच्या शेअर्सच्या हालचालीबाबत जाणून घेऊ आणि शेअर बाजाराच्या तज्ञांकडून जाणून घेऊ की या स्टॉकमध्ये अजूनही गुंतवणूक केली जाऊ शकते का ?

२,७०० रुपये आहे ब्रेक-इव्हन पॉईंट
सीएनआय रिसर्चचे सीएमडी किशोर ओस्तवाल म्हणाले की, रुची सोयाचे ९९ टक्के शेअर्स रद्द झाले होते. अशा परिस्थितीत शेअर्सची किंमत प्रति शेअर २,७०० रुपयांच्या पातळीपर्यंत पोचली तर तो त्यांचा ब्रेक-इव्हन पॉईंट असेल. म्हणजे ना नफा ना तोटा होण्याची परिस्थिती येईल.

२४ जून रोजी रुचि सोया शेअरच्या खरेदीचे ४३,१७७ करार झाले आणि त्यात ५ टक्के अप्पर सर्किट लागले. बीएसईच्या शेअरची किंमत १३६७.२० रुपये प्रति शेअर होती.

अजूनही रुची सोयाच्या शेअरची खरेदी केली जाऊ शकते का?
केडिया अ‍ॅडव्हायझरीचे संस्थापक आणि गुंतवणूकदार अजय केडिया म्हणतात की, शेअरमध्ये निरंतर वाढ दिसून येत आहे आणि त्यात अप्पर सर्किट असल्याचे दिसते. अशा परिस्थितीत ज्या गुंतवणूकदारांना अल्प मुदतीची गुंतवणूक करुन नफा कमवायचा असेल, त्यांनी शेअर्स खरेदी करणे टाळावे. जर एखाद्याला तीन ते पाच वर्षे गुंतवणूक करायची असेल, तर त्याने हळूहळू हे शेअर्स खरेदी करावे. आत्ता या शेअरच्या किंमती एकत्रित होतील.