गायिका अक्षराचं गाणं ऐकण्यासाठी तुफान गर्दी, लोकांनी तोडल्या खुर्च्या

पाटणा : वृत्तसंस्था – बिहारमधील मोतीहारी या ठिकाणी भोजपुरी गायिका अक्षरा सिंह च्या कार्यक्रमात लोकांनी अक्षरश :  गोंधळ घातला. सूत्रांच्या माहितीनुसार सांगितले जाते अक्षरा सिंहला ऐकण्यासाठी प्रचंड गर्दी जमली होती, पण नंतर गर्दी इतकी वाढली की तिथे उभे राहायला सुद्धा जागा नसल्यामुळे लोकांनी खुर्च्या तोडल्या.

काही प्रेक्षक आपापसांतच मारामारी करू लागले , भांडण इतके वाढले की कार्यक्रम स्थळावरील अनेक खुर्च्या तोडल्या गेल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप आमदार सचिन्द्र सिंह आयोजित मोतीहारी येथील कल्याण महोत्सवात गायिका अक्षरा सिंह आपला कार्यक्रम प्रस्तुत करण्यासाठी आली होती. तेव्हाच हा गोंधळ सुरु झाला.

प्रेक्षकांमध्ये हाणामारी सुरु झाली ज्यामध्ये १२ हुन अधिक लोकं जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून एकाची स्थिती गंभीर आहे. या घटनेबद्दल सांगायला प्रशासन टाळाटाळ करत आहे.

You might also like