#Video : स्टार डान्सर सपना चौधरीचे ‘दिवाने’ झाले ‘आऊट ऑफ कंट्रोल’, पोलिसांकडून ‘लाठीचार्ज’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – डान्सर सपना चौधरीचे दीवाने तुम्हाला फुटाफुटावर भेटतील. अनेकदा सपानाच्या चाहत्यांचा तिच्या शोमध्ये वेडेपणाने गोंधळ पाहायला मिळतो. कधी कधी तरी यां चाहत्यांना कंट्रोल करणंही पोलिसांना अवघड होऊन जातं. नुकताच असा एक किस्सा समोर आला आहे जिथे सपनाच्या कार्यक्रमात पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

सपनाने नुकताच उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे एक कार्यक्रम केला. सपनाला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने चाहते तेथे आले होते. मुरादाबादमध्ये जिल्हा कृषी विकास आणि सांस्कृतिक प्रदर्शनात सपना आली होती. हा कार्यक्रम मुरादाबादच्या रेल्वे स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला होता. जशी सपना चौधरी स्टेजवर आली तेस सर्व चाहत्यांना कंट्रोल करणं पोलिसांसाठी अवघड होऊन बसलं.

View this post on Instagram

#sapnachaudhary Moradabad

A post shared by ѕнυαιв αℓνι (@_shuaib_alvi_official) on

सपना चौधरीच्या कार्यक्रमाती चाहत्यांना कंट्रोल करण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. तरीही सपनाचे दीवाने कंट्रोलमध्ये येत नव्हते. मोठ्या मुश्किलीने सपनाने आपल्या डान्सचे सादरीकरण केले त्यानंतर ती निघून गेली. या कार्यक्रमाचे अनेक व्हिडीओ सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात सपना आपल्या डान्सचा जलवा दाखवत प्रेक्षकांची मने जिंकत आहे आणि त्यांना आपल्या तालावर थिरकायला लावत आहे.

तुम्हाला सांगू इच्छितो की, सपनाच्या कार्यक्रमात असा गोंधळ होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही अशा अनेक घटना समोर आल्या आहेत जेव्हा सपनाच्या चाहत्यांना कंट्रोल करणं पोलिस प्रशासनाला आव्हानात्मक झालं आहे. सपना बिग बॉसमध्येही दिसली होती. यानंतर ती सिनेमातही दिसली होती.

Loading...
You might also like