Rudraksh Mahotsav in Sehore | धक्कादायक! रुद्राक्ष महोत्सवामध्ये झालेल्या धक्काबुक्कीत बुलडाण्यातील 3 महिला बेपत्ता

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाईन – Rudraksh Mahotsav in Sehore | महाशिवरात्रीजवळ आल्यामुळे देशभरात सध्या उत्साहाचे वातावरण आहे. महाशिवरात्रीनिमित्ताने अनेक भाविक दर्शनासाठी विविध ठिकाणी जात असतात. मध्यप्रदेश येथील सिहोरमध्ये महाशिवरात्रीच्या (Mahashivratri) निमित्ताने मोफत रुद्राक्ष वाटपचा कार्यक्रम सुरू होता. यादरम्यान एक मोठी दुर्घटना घडली आणि त्या ठिकाणी चेंगराचेंगरी झाली. (Rudraksh Mahotsav in Sehore)

 

काय घडले नेमके?

सिहोर या ठिकाणी महाशिवरात्रीच्या निमित्ताने मोफत रुद्राक्ष वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे त्याठिकाणी देशभरातून लाखो भाविक दाखल झाले आहेत. त्यामुळे सिहोरला जाणाऱ्या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. जवळपास 30 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यादरम्यान लाखोंच्या संख्येत भाविक दाखल झाल्याने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली.

 

या ठिकाणी महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भाविक गेले आहेत. यादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत त्यामधील 3 महिला भाविक बेपत्ता झाल्याचे समोर आले आहे. याबाबत तीन महिला बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या नातेवाईकांनी खामगाव पोलिसात दिली आहे. सिहोरला गेलेल्या भाविकांशी संपर्क होत नसल्याने त्यांच्या नातेवाईकांनी हि तक्रार दाखल केली आहे. या महिला वाडी, सुटाळा खुर्द या ठिकाणच्या रहिवाशी आहेत.

 

 

 

Web Title :- Rudraksh Mahotsav in Sehore | rudraksh mahotsav in sehore
3 women missing from buldhana district maharashtra

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा