‘मेड इन इंडिया’ची पावर, अ‍ॅन्टी रेडियशन मिसाइल ‘रूद्रम’चं सुखोई फायटरव्दारे यशस्वी परीक्षण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (DRDO) ने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. शुक्रवारी रविवारी अँटी-रेडिएशन क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी भारताने केली. हे क्षेपणास्त्र डीआरडीओने बनवले आहे. सुखोई -30 लढाऊ विमानाने त्याची चाचणी घेण्यात आली आहे.

भारतातील हे पहिले क्षेपणास्त्र आहे, जे कोणत्याही उंचीवरून उडवले जाऊ शकते. हे क्षेपणास्त्र कोणत्याही प्रकारचे सिग्नल आणि रेडिएशन हस्तगत करू शकते. तसेच, त्याच्या रडारमध्ये आणून हे क्षेपणास्त्र नष्ट करू शकते.

सध्या या क्षेपणास्त्राची विकासात्मक चाचणी सुरू आहे. परंतु या चाचण्या पूर्ण झाल्यानंतर लवकरच ते सुखोई आणि स्वदेशी विमान तेजसमध्येही वापरता येतील.

या आठवड्याच्या सुरुवातीला DRDO ने सुपरसोनिक मिसाइल असिस्टेड रिलीज़ ऑफ टॉरपीडो (SMART) ची यशस्वी चाचणी केली. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (DRDO) ओडिशाच्या किनारपट्टी भागात याची चाचणी केली.