डायटीशिअन ऋजुता दिवेकर यांच्या पोलीसांना डाएट टिप्स्

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन  – ऋजुता दिवेकर यांची ओळख हि डायटीशिअन म्हणून आहे. त्यांची आहारतज्ञता एवढी आहे कि सेलिब्रिटीसुद्धा त्यांच्याकडून आहाराचा सल्ला घेतात. त्याच ऋजुता दिवेकर आता मुंबई पोलीसांच्या आहारावर काम करून त्यांची तब्बेत शेपमध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी १५० पोलिसांच्या तुकडीच्या आहार प्रशिक्षणाला सुरुवात देखील झाली आहे.

मुंबईच्या नायगाव पोलीस प्रशिक्षण केंद्रावर १५० पोलिसांच्या तुकडी साठी ऋतुजा दिवेकर या प्रशिक्षण देणार आहेत. या १५० पोलिसांना कामाचा ताण घेऊन प्रशिक्षण करावे लागू नये म्हणून त्यांना ३० दिवसांची सुट्टी देखील देण्यात आली आहे. ऋजुता दिवेकर ,केईएम रुग्णालयातील काही निवडक डॉक्टरांचे पथक आणि इशा फाउंडेशनमधील काही योग तज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर पार पडते आहे.

कोण आहेत ऋजुता दिवेकर

ऋजुता दिवेकर यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना  अ‍ॅरोबिक्स आणि ‘एस.एन.डी.टी’मधून स्पोर्टस-सायन्स अ‍ॅण्ड न्यूट्रिशियनचा कोर्स पूर्ण केला आहे. आपली आवड याच क्षेत्रात आहे हे ओळखल्या नंतर ऋजुता दिवेकर यांनी आहारशास्त्राचा संपूर्ण अभ्यास केला आणि त्यांनी याच क्षेत्रात स्वतःला झोकून दिले. काय खावे काय नखावे असे सांगत ऋतुजा यांनी अनेकांना उत्तम आरोग्य प्राप्त करून दिले आहे.

करीना कपूर सारख्या अभिनेत्रीला ऋतुजा यांनी आहाराचे मार्गदर्शन देऊन करीनाच्या सौंदर्यात भर घातली आहे. करीनाला सडपातळ बनवण्याचा मंत्र दिल्यावरच त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या. त्याच प्रमाणे ऋतुजा दिवेकर यांनी आरोग्याचा मंत्र देणारे आणि विक्रमी खप असणारे पुस्तक सुद्धा लिहले आहे. ऋतुजा यांनी इतर आहारतज्ञा प्रमाणे पश्चिमात्य देशातील डायटचे अनुकरन नकरता भारतीय आहाराला साजेशी स्वतःची पध्द्ती विकसित केली आहे.

पोलिसांच्या ड्युटीच्या वेळा, कामावर असतांना करावी लागणारी कसरत, सतत खुर्चीत बसून करावे लागणारे काम, वेळी अवेळी कधी घरचा कधी बाहेरचा घ्यावा लागणारा आहार, अनियंत्रित चहाचे सेवन यामुळे पोलीसांचा लठ्ठपणा वाढत जातो. महाराष्ट्र पोलीसांच्या लठ्ठपणाची मराठी चित्रपटात देखील कधी कधी खिल्ली उडवली जाते त्याच लठ्ठ्पणला झटकण्यासाठी पोलीसांनी डायटीशिअन ऋजुता दिवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम आरोग्यासाठी धडे गिरवायला सुरुवात केली आहे.