हिवाळ्यात ‘ही’ १० सर्वोत्तम सुपरफूडखा अन् निरोगी राहा

पोलीसनामा ऑनलाइन – हवामानातील बदलामुळे प्रतिकारशक्ती कमकुवत होणे, सर्दी-खोकला, इन्फेक्शन, फ्लू, विषाणूचा धोकाही वाढतो. अशा परिस्थितीत आपल्याला आपल्या आहारात काही बदल करण्याची आवश्यकता आहे. अलीकडेच सेलिब्रिटी डायटिशियन रुजुता दिवेकर यांनी हिवाळ्यात खाण्यासाठी १० सर्वोत्तम सुपरफूड सांगितले आहेत. हे पदार्थ केवळ हंगामी आजारांपासूनच आपले संरक्षण करणार नाहीत, तर यामुळे केस गळणे, हात-पायात जळजळ होणे, सांधे व संधिवात, ओठ फाटणे यांसारख्या समस्या उद्भवणार नाहीत.

१) बाजरी
बाजरीमध्ये फायबर आणि व्हिटॅमिन बी भरपूर प्रमाणात असते म्हणून हिवाळ्यामध्ये त्याचे सेवन फायदेशीर ठरते. बाजरी रोटी, पापड, लाडू किंवा थालीपीठ बनवूनदेखील खाऊ शकता.

२) हिरव्या भाज्या
हिवाळ्यात पालक, मेथी, राजगिरासारख्या हिरव्या पालेभाज्या खा. याशिवाय लसूण, आले, गाजर, वाटाणा मशरूम इत्यादी भरपूर प्रमाणात खा. पोटाबरोबरच या भाज्या प्रतिकारशक्ती वाढविण्यासही फायदेशीर ठरतात.

३) डिंक
ज्यांना सांधेदुखीची समस्या आहे, त्यांनी हिवाळ्यात डिंकाचे लाडू खावेत. तसेच हे मासिक पाळी, पोटाची समस्या आणि त्वचेची चमक वाढवण्यात मदत करते.

४) देसी तूप
औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेले देसी तूप आरोग्यासह त्वचेसाठीदेखील फायदेशीर आहे. त्याचे सेवन पोटासाठी फायदेशीर आहे तसेच त्वचेची समस्याही दूर ठेवते.आणि हाडे मजबूत करते.

५) कंद किवा मूळ असलेल्या भाज्या
बटाटा, गाजर, शलगम यांसारख्या मुळे असलेल्या भाज्या यामध्ये अधिक ऊर्जा असते. तसेच फायबर असते. यामुळे पोटाचा त्रासही दूर होतो.

६) तीळ
हिवाळ्यात आहारामध्ये तीळ, चिक्की यांचा समावेश करा. यात फॅटी ॲसिडस्, व्हिटॅमिन ई असते जे सांध्यातील वेदना, केस गळणे आणि पोटाच्या समस्येस प्रतिबंधित करते. तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढवते.

७) हंगामी फळे
पेरू, सफरचंद, सीताफळ ही हंगामी फळं हिवाळ्यात खाल्ले जातात. अँटिऑक्सिडेंट्स, बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे आणि खनिज समृद्ध ही फळे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत.

८) शेंगदाणे
मुबलक प्रमाणात पोषणयुक्त शेंगदाणे सेवन करणे हृदयासाठी फायदेशीर आहे. यात एमिनो ॲसिडस्,पॉलीफेनॉल्स आणि व्हिटॅमिन बीदेखील असतात, जे आपल्याला हंगामी रोग टाळण्यास मदत करतात.

You might also like