ठाण्यात दहिहंडी उत्सवात मुख्यमंत्र्यांसमोरच नियमांचे उल्लंघन

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन 

ठाण्यात हिरानंदानी मेडोज येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहासमोरील संपूर्ण चौक अडवून दहिहंडी उत्सव साजरा करण्यात आला. यामुळे नागरिकांची मोठ्याप्रमाणात गैरसोय झाली. या उत्सवासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा हजर होते. मुख्यमंत्री येथे आल्यानंतर सुरक्षेच्या नियमावलींना बगल देत आयोजकांनी येथे नऊ थरांची दहीहंडी सुरक्षा व्यवस्थेविना उभी करत न्यायालयाच्या आदेशाचा भंग केला. यामुळे गोविंदांचा जीवही धोक्यात आला होता. याठिकाणी पोलिस आयुक्त, जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तही उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीत उच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करण्यात आल्याचे दिसून आले.

[amazon_link asins=’B07GVMTWWX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’fbcebc57-aff8-11e8-a09b-b73ea3b6f2e5′]

भारतीय जनता पक्षाकडून साजऱ्या करण्यात आलेल्या या उत्सवासाठी वाहतूक विभागाकडून अनेक बदल अचानक करण्यात आले. शहरातील महत्त्वाचा वर्दळीचा रस्ता संपूर्ण दिवसभर बंद करताना साधी वाहतूक अधिसूचनाही काढली नव्हती. चक्क हेल्थकेअर सेंटरचे दार बंद करून या भागात स्टेज थाटण्याचा प्रकारही घडला. पर्यायी रस्ते उपलब्ध करून न देता संपूर्ण रस्ता बंद करण्यात आला होता. कोणत्याही सूचना नसल्याने वाहनचालकांना मोठा त्रास झाला. १४ वर्षांखालील मुलांना दहीहंडीच्या थरांवर थर चढण्यास बंदी असून सुरक्षेची व्यवस्थाही महत्त्वाची ठरते. सुरक्षेसाठी सेफ्टी बेल्ट, हेल्मेट, सुरक्षा जाळी किंवा अन्य कोणत्याही प्रकारची व्यवस्था नव्हती. विशेष म्हणजे, पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, जिल्हाधिकारी राजेंद्र नार्वेकर आणि महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रकार सुरू होता.

मुंबई में दहीहंडी फोड़ने के दौरान युवक की मौत