Rule Change | 1 जानेवारीपासून LPG सिलेंडरच्या दरापासून डिजिटल पेमेंटच्या नियमापर्यंत होणार ‘हे’ 13 मोठे बदल; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Rule Change | नवीन वर्ष 2022 सुरू (New Year 2022) होण्यास अवघे तीन दिवस उरले आहेत. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेपासून काही बदल किंवा नवीन नियम देशात लागू होतात. यामुळे नवीन वर्षाची पहिली तारीख म्हणजेच 1 जानेवारी 2022 पासून काही नवीन नियम आणि बदल (Rule Change) होणार आहेत. जे तुमच्या किचनपासून ते तुमच्या खिशाचे बजेट बिघडवू शकतात.

 

सर्वसामान्यांपासून ते व्यावसायिकांपर्यंत या बदलांचा फटका बसणार आहे. नवीन वर्षात एलपीजीच्या किमतीपासून ते बँकेचे एटीएम (ATM), डेबिट-क्रेडिट कार्ड (Debit Credit Card) तसेच गुगल (Google)आणि पोस्ट पेमेंट्स बँकेच्या (Post Payments Bank) नियमांमधील बदलांबाबत जाणून घेवूयात…

 

1. एटीएममधून पैसे काढणे महागणार (Withdrawing money from ATMs will be expensive)
हा नियम म्हणजे मोफत मासिक मर्यादा संपल्यानंतर वाढलेली फी लागू होईल. या संदर्भात प्रत्येक बँक आपापल्या परीने ग्राहकांना माहिती देत आहेत. बँकांच्या नोटीसमध्ये माहिती देताना असे म्हटले आहे की 1 जानेवारी 2022 पासून मोफत मर्यादा अधिक एटीएम व्यवहार शुल्काचा दर 20 रुपये + जीएसटी वरून 21 रुपये + जीएसटी वाढवला जाईल. म्हणजेच आता ग्राहकांना पूर्वीपेक्षा एक रुपया जास्त द्यावा लागणार आहे.

 

2. FMCG उत्पादने महागणार (FMCG products will become more expensive)
नवीन वर्षाची सुरुवात महागाईने होणार आहे. कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्सपासून ऑटोपर्यंत, स्टीलच्या किमती वाढतील. यासोबतच, तुम्हाला फास्ट मूव्हिंग कंझ्युमर गुड्स (FMCG) उत्पादने आणि लॉजिस्टिकसाठी नवीन वर्षात जास्त पैसे द्यावे लागतील. (Rule Change)

3. कपडे आणि पादत्राणांच्या किमतीत वाढ (Rising prices of clothing and footwear)
पुढील वर्षी 1 जानेवारीपासून कपडे आणि पादत्राणे महाग होणार आहेत. कारण केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क बोर्डाने (CBIC) विविध प्रकारचे कपडे, पोशाख आणि पादत्राणे यांच्यासाठी वस्तू आणि सेवा कराचा दर 5 टक्क्यांवरून तब्बल 12 टक्के केला आहे. नवीन GST दर 1 जानेवारी 2022 पासून लागू होईल. मात्र, काही सिंथेटिक फायबर आणि धाग्यांवरील GST दर 18 टक्क्यांवरून 12 टक्के करण्यात आला आहे.

 

4. ऑनलाइन ऑटो बुकिंग महागणार (Online auto booking will become more expensive)
ऑटो रिक्षा ऑनलाइन बुक करून प्रवास करणेही नवीन वर्षापासून महाग होणार आहे. जीएसटी प्रणालीमध्ये कर दर आणि प्रक्रियेतील बदलांनुसार, ई-कॉमर्स सेवा प्रदात्यांना वाहतूक आणि रेस्टॉरंट क्षेत्रात प्रदान केलेल्या सेवांवर कर भरावा लागेल.

 

5. खाद्यपदार्थ ऑनलाइन मागविण्यावर 5% कर (5% tax on food order online)
स्विगी आणि झोमॅटो सारख्या ई-कॉमर्स कंपन्या देखील प्रक्रियात्मक बदलांतर्गत त्यांच्या सेवांवर जीएसटी आकारतील. कंपन्यांना या सेवांच्या बदल्यात जीएसटी वसूल करावा लागेल आणि तो सरकारकडे जमा करावा लागेल. यासाठी त्यांना सेवांचे बिल जारी करावे लागेल.

 

6. रिफंडसाठी आधार पडताळणी आवश्यक (Aadhaar verification required for refund)
करचोरी रोखण्यासाठी, सरकारने जीएसटी परताव्याचा दावा करणार्‍या करदात्यांना जीएसटी क्रमांकासह आधार पडताळणी अनिवार्य केली आहे. 1 जानेवारी 2022 पासून, ज्या व्यावसायिकांचे पॅन-आधार लिंक नाही त्यांचा GST रिफंड थांबवला जाईल. याशिवाय, आता जीएसटी परतावा फक्त बँक खात्यावर पाठविला जाईल, जो पॅनशी (PAN Card) जोडलेला असेल.

 

7. व्यापार्‍यांनी अपील केल्यास 25 टक्के दंड (25 % penalty if traders appeal)
नवीन नियमानुसार, जर एखाद्या व्यावसायिकाला कर प्राधिकरणाच्या विरोधात कोणत्याही निर्णयाला आव्हान द्यायचे असेल, तर त्याला आधी आकारण्यात आलेल्या दंडाच्या 25 टक्के रक्कम भरावी लागेल. उदाहरणार्थ, अयोग्य स्टोरेज किंवा वाहतूक नियमांचे पालन न केल्यामुळे उत्पादन जप्त केले असल्यास आणि कर प्राधिकरणाने दंड ठोठावला, तर निर्णयाविरुद्ध अपील करण्यापूर्वी, संबंधित डीलरला दंडाच्या रकमेच्या 25% रक्कम भरावी लागेल.

8. टॅक्स कमी भरल्यास सक्ती (Fine to pay less tax)
याशिवाय, CBIC च्या अधिसूचनेनुसार, कर कमी असल्यास किंवा न भरल्यास कराव्या लागणार्‍या कारवाईतही मोठे बदल करण्यात आले आहेत.
आतापर्यत, असे करणार्‍यांविरूद्ध बँक खाती किंवा मालमत्ता जप्त करण्याची प्रदीर्घ नोटीस प्रक्रिया होती, जी आता रद्द करण्यात आली आहे.
म्हणजे आता नोटीस न देता मालमत्ता जप्त करण्यात येणार आहे.

 

9. ई-वे बिलमध्ये अपील करण्याची पद्धत (Method of appeal in e-way bill)
ई-वे बिलाद्वारे मालाची वाहतूक करताना झालेल्या चुकीसाठी आता कराची तरतूद हटवून थेट दंड दुप्पट होणार आहे.
आता दंडाच्या विरोधात अपील केल्यावर, त्यातील 25 टक्के रक्कम भरल्यानंतरच उच्चस्तरावर अपील केले जाईल.
यापूर्वी 10 टक्के कर निश्चित करण्यात आला होता.

 

10. एलपीजी सिलेंडरची किंमत (LPG cylinder Price)
एलपीजी सिलिंडरची किंमत प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला ठरवली जाते.
अलीकडच्या काही महिन्यांत एलपीजीच्या किमती वाढल्या आहेत आणि सबसिडीही बंद झाली आहे.
1 जानेवारी 2022 रोजी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सिलिंडरच्या किमती वाढतात की नाही हे पाहणे महत्वाचे असेल.

 

11. डिजिटल पेमेंट नियम (Digital Payment Rule)
नवीन वर्षापासून ऑनलाइन पेमेंट करताना, प्रत्येक वेळी 16-अंकी डेबिट किंवा क्रेडिट कार्ड क्रमांकासह कार्डचे सर्व तपशील भरावे लागतील.
म्हणजेच, आता जेव्हा तुम्ही ऑनलाइन शॉपिंग कराल किंवा शॉपिंग केल्यानंतर डिजिटल पेमेंट कराल,
तेव्हा तुम्हाला प्रत्येक वेळी कार्डची संपूर्ण माहिती टाकावी लागेल.

12. वेबसाइट सेव्ह करणार नाही डिटेल (Website will not save the details)
या नवीन बदलांतर्गत, मर्चंट वेबसाइट, Google Pay किंवा इतर अ‍ॅप्स यापुढे तुमचे डेबिट आणि क्रेडिट कार्ड तपशील संग्रहित किंवा सेव्ह करू शकणार नाहीत.
याशिवाय, नवीन प्रणाली अंतर्गत, जर तुमच्या कार्डशी संबंधित कोणतीही माहिती वेबसाइट किंवा अ‍ॅपवर आधीच सेव्ह केली असेल तर ती आता आपोआप हटविली जाईल.

 

13. पोस्ट ऑफिसमधून पैसे काढण्यासाठी शुल्क (Charges for withdrawal from post office)
बँकांप्रमाणेच आता इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या खातेदारालाही पैसे काढण्यासाठी शुल्क भरावे लागणार आहे.
तुम्ही एका ठराविक मर्यादेपेक्षा जास्त रक्कम काढली आणि जमा केल्यास, तुम्हाला त्यासाठी IPPB ला शुल्क द्यावे लागेल.
हा नियम 1 जानेवारी 2022 पासून लागू होणार आहे.

 

Web Title :- Rule Change | from the price of lpg cylinder to rules of digital payment these big changes are going to happen from january 1

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Corona Restrictions | राज्यात ‘कोरोना’च्या रुग्णसंख्येत वाढ ! 2 दिवसांत निर्बंधाबाबत घेणार निर्णय; राजेश टोपेंची माहिती

 

Maharashtra Police Recruitment | ‘महाराष्ट्र पोलीस दलात 50 हजार पदे भरणार’ – गृहमंत्री

 

Pune Crime | पुण्यात 29 वर्षीय महिलेचा विनयभंग ! डेक्कन पोलिस ठाण्यात वकिलावर गुन्हा दाखल