SBI मध्ये PPF अकाऊंट सुरू करताय ? मग जाणून घ्या ‘या’ ३ गोष्टी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PPF (पब्लिक प्रॉव्हिडंट फंड) हा गुंतवणूकीच्या दृष्टीने चांगला आणि सुरक्षित पर्याय मानला जातो. या गुंतवणुकीवर परतावा देखील चांगला मिळतो. कोणतीही बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये PPF अकाऊंट उघडता येऊ शकते. पपीएफ योजनेंतर्गत गुंतवलेल्या पैशांची तुम्हाला हमी मिळते. या योजनेतून मिळणा-या परताव्याच्या फायद्यावर कोणताही टॅक्स लावला जात नाही. तसेच यात नॉमिनीचीही व्यवस्था करण्यात आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) या सरकारी बँकेत PPF अकाऊंट उघडलं तर त्याचे काय फायदे मिळतात तसेच व्याजदर किती मिळतो याविषयी आपण माहिती घेणार आहोत.
गुंतवणूक –
PPF अकाऊंटमध्ये एका आर्थिक वर्षात तुम्ही कमीत कमी ५०० रुपये आणि जास्तीत जास्त दीड लाखांपर्यंत गुंतवणूक करू शकता. यापेक्षा जास्त पैसे या अकाऊंटमध्ये गुंतवले तर त्यावर तुम्हाला व्याज किंवा इनकम टॅक्स सूट मिळणार नाही. ही गुंतवणूक तुम्ही वर्षातून एकदा किंवा प्रत्येक महिन्यालाही करू शकता.
व्याजदर –
तुमच्या PPF वर किती व्याज मिळेल याविषयीचा निर्णय आरबीआय प्रत्येक तीन महिन्याला घेते. सध्या PPF वर ८ % दराने व्याज दिल जात. PPF अकाउंटमध्ये ५ तारखेपासून महिन्याच्या अंतिम तारखेपर्यंत ज्या दिवशी सर्वात कमी बॅलन्स असेल, त्यावर व्याजाचा हिशोब केला जातो. त्यानंतर प्रत्येक वर्षीच्या ३१ मार्च रोजी पेमेंट केलं जातं. आयकर कायद्याच्या कलम ८८ अंतर्गत व्याजदर मुक्त आहे.
मुदत-
PPF अकाऊंटची मुदत १५ वर्ष आहे. त्यानंतर तुम्ही ती आणखी पाच वर्षांपर्यंत वाढवू शकता. महत्वाची गोष्ट म्हणजे पाच वर्षांपर्यंत PPF अकाउंट मधून पैसे काढता येत नाहीत.