‘राज्यकर्त्यांनी बेरोजगार युवकांच्या आयुष्याशी खेळू नये’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – देशातील आणि राज्यात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हाताला काम नसल्यामुळे युवक निराश होत असून राज्यकर्त्यांनी बेरोजगार युवकांच्या आय़ुष्याशी खेळू नये असा निर्वानिचा इशारा मराठा, मुस्लीम, धनगर कृती समिती, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात आला आहे. तसेच आगामी काळात राज्यातील बेराजगार तरुणांचे संघटन करून राजकर्त्यांना जाब विचार असल्याचा इशारा कृती समितीने दिला आहे.

पुण्यात ऍड. रवींद्र रणसिंग यांच्या कार्यालयात शनिवारी मराठा, मुस्लीम, धनगर कृती समितीची बैठक पार पडली. यावेळी समितीच्या आगामी काळातील कार्यक्रमाविषयी चर्चा करण्यात आली.

देशाचा विकासदर अत्यंत खालावला असून त्याचा परिणाम रोजगार उपलब्ध करण्यावर झाला आहे. या पार्श्वभूमीवर बेरोजगार युवकांचे संघटन करून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मराठा मुस्लीम, धनगर कृती समिती प्रयत्न करणार आहे. त्यासाठी सुरुवातीला युवकांचा डेटा ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने गोळा करून त्यांचे संघटन करण्यावर भर देण्याचे येणार आहे.

या बैठकीला समितीचे अध्यक्ष ऍड. रवींद्र रणसिंग, उपाध्यक्ष गणपत देवकाते, सचिव मकबूल तांबोळी, माजी प्रशाकीय के.सी. कारकर, पृथ्वीराज काकडे, समन्वयक समीना शेख, सलीम पाटेकरी, अंगद माने, पत्रकार रवींद्र देशमुख, पोपट कोकरे, रणजीत सोलणकर, उद्योजक अनिल देवकाते, मिलींद पाटील, दिगंबर मांडवगणे, ऍड. प्रसाद भरगुडे आदी उपस्थित होते.

दरम्यान देशात आणि राज्यात बेरोजगारीची समस्या भीषण स्वरुप धारण करत आहे. त्यामुळे युवकांच्या हाताला काम मिळावे, यासाठी मराठा मुस्लीम धनगर कृती समितीने लढा देण्याचे ठरवले आहे. त्यासाठी एक वेबसाईट तयार करण्यात येणार असून बेरोजगार युवक त्या वेबसाईटवर आपली नोंदणी करू शकतील. त्यानंतर या युवकांसाठी फेब्रुवारी 2019 मध्ये एक राज्यस्तरीय मेळावा घेण्यात येईल, अशी माहिती समितीचे अध्यक्ष ऍड. रवींद्र रणसिंग यांनी दिली.

यावेळी सर्व सामान्य नागरिकांना परवडणाऱ्या किंमतीत घर मिळवून देण्यासाठी चळवळ उभी करण्याचे ठरविण्यात आले. सलीम पाटेकरी यांनी ऑनलाई डेटा गोळा करण्यासंदर्भात माहिती दिली. तर पोपटराव कोकरे यांनी मेळाव्याच्या आयोजनासाठी झटून कामाला लागण्याचे आश्वासन दिले. तर मेळाव्याची राज्यभर जाहिरात करून युवकांची नोंदणी करण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज रवींद्र देशमुख यांनी व्यक्त केली.

फोटोओळ : 1. ऍड. रवींद्र रणसिंग, उपाध्यक्ष गणपत देवकाते, सचिव मकबूल तांबोळी, माजी प्रशाकीय के.सी. कारकर, पृथ्वीराज काकडे, समन्वयक समीना शेख, सलीम पाटेकरी, अंगद माने, पत्रकार रवींद्र देशमुख, पोपट कोकरे, रणजीत सोलणकर, उद्योजक अनिल देवकाते, मिलींद पाटील, दिगंबर मांडवगणे, ऍड. प्रसाद भरगुडे आदी उपस्थित होते.