अफवेने मिस्टर बीन यांना पुन्हा मारले

मुंबई: वृत्तसंस्था

लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांचा चाहता आणि सर्वांना आपल्या अभिनयाने खळखळून हसवणाऱ्या मिस्टर बीनला  अफवांनी पु्न्हा मारले. मिस्टर बीन म्हणजेच रोवन अकिन्सन यांच्या निधनची अफवा पसवरण्यात येत आहे. फॉक्स न्यूज या नावाने या बातमीची फेसबुक पोस्ट सध्या व्हारल झाली असून ही पोस्ट वाचून मीस्टर बीनच्या चाहत्यांना धक्का बसला. परंतु ही अफवा असल्याचे समजताच चाहत्यांनी सुटकेचा श्वास सोडला.

मिस्टर बीन यांचा लॉस एंजलिस येथे एका अपघातात मृत्यू झाल्याची फेसबुक पोस्ट नुकतीच व्हायरल झाली होती. मीस्टर बीन यांच्या अपघाती निधनाची काही क्षणात लाखो चाहत्यांपर्यंत पोहचली. याची माहिती रोवन अकिन्सन यांच्या निकटवर्तीयांना समजताच त्यांनी ही अफवा असल्याचे सांगून निधनाच्या बातमीचे खंडन केले. रोवन यांचा कसलाही अपघात झाला नसून ते सुखरुप असल्याचे सांगितले. मात्र, ही अफवा लाखो नागरिकांपर्यंत पोचल्याने अनेकांनी दु:ख व्यक्त केले.

[amazon_link asins=’B07CKPLGDT’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d468dc15-8e5b-11e8-8c91-e3415fef8cfb’]

वेगळच सत्य समोर…

‘हॉक्स स्लेअर नेट’नं या बातमीची पडताळणी केल्यानंतर वेगळंच सत्य समोर आलं. त्यानुसार, बीन यांच्या बातमीच्या पोस्टवर क्लिक करताच ही पोस्ट शेअर करणाऱ्या  वेबसाइटची फेसबुक विंडो उघडली जाते आणि एक व्हिडिओ समोर येतो. मात्र, हा व्हिडिओ शेअर केल्याशिवाय फेसबुक युजर्सना तो पाहता येत नाही. युजरने व्हिडिओ शेअर करायचा प्रयत्न करताच त्याच्या संगणक व्हायरस हल्ला होण्याची किंवा फेसबुक पेज हॅक होण्याची शक्यता वाढते.

कलाकार आणि प्रसिद्ध व्यक्तींविषयी त्यांच्या चाहत्यांना किंवा सामान्य नागरिकांना अधिक उत्सुकता असते. याचा गैरफायदा काही भामटे घेतात आणि सोशल मीडियाचा वापर करून नागरिकांना फसवतात. याआधीही मिस्टर बिन यानं मानसिक तणावातून आत्महत्या केल्याची अफवा पसरवण्यात आली होती. त्यामुळं लोकांनी अशा अफवांपासून सजग राहण्याची गरज आहे.
जाहिरात