राहुल गांधींना कार्यक्रमाचे निमंत्रण ही अफवा : आरएसएस

नागपूर : पोलीसनामा

आरएसएसच्या कार्यक्रमासाठी निमंत्रित पाहुण्यांची यादी बनवण्यात आलेली नाही. त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यावरून कुठलाच निर्णय झालेला नाही, असे स्पष्टीकरण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून करण्यात आले आहे. संघाकडून देण्यात आलेल्या या स्पष्टीकरणामुळे राहुल यांना संघाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण आले असल्याच्या चर्चांवर पडदा पडला आहे.

[amazon_link asins=’8192910962,0062641549′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c4fc2c69-ab3f-11e8-ae7f-61e79b71a93d’]

यासंदर्भात नागपूर येथील संघ विचारक विराग पाचपोर यांनी सांगितले की, राहुल गांधींना संघाकडून कुठलेही अधिकृत निमंत्रण दिले गेलेले नाही. राहुल आणि संघविचारांमध्ये फार मोठ्या प्रमाणात मतभेद आहेत. निमंत्रण देऊ आणि निमंत्रण दिले या वाक्यांमध्ये फरक आहे. ही फक्त माध्यमांतर्फे पसरवण्यात आलेली अफवा आहे. भविष्य का भारत : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ का दृष्टिकोण  याविषयावर दिल्लीमध्ये आरएसएसचा कार्यक्रम होणार आहे. आमच्यातर्फे जाहीर प्रसिद्धी पत्रकामध्ये राहुल यांच्या नावाचा उल्लेख केला नसल्याचे संघाकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, राहुल गांधी आणि सीताराम येचुरी यांना दिल्लीमध्ये होणाऱ्या संघाच्या एका कार्यक्रमासाठी बोलावले जाऊ शकते, अशी चर्चा होती. राहुल गांधी यांनी वेळोवेळी संघावर टीका केली आहे. काही दिवसांपूर्वीच लंडनमध्ये राहुल यांनी आरएसएसची तुलना मुस्लिम ब्रदरहुड संघटनेशी केल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. गेल्यावर्षी जून महिन्यात माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आरएसएसच्या एका कार्यक्रमात सहभागी झाले होते.मुखर्जी यांच्या या निर्णयानंतर काँग्रेसनेही नाराजी व्यक्त झाली होती.

देशात आता आणीबाणीची लागू होणार : अरूंधती रॉय यांची प्रतिक्रिया