‘या’ पाकिस्तानी डॉक्टरच्या प्रेमात दंग झाली होती प्रिन्सेस डायना, लग्न करून तिथंच राहण्याची होती इच्छा : डॉक्युमेंटरी

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : ब्रिटनच्या प्रिन्स चार्ल्सची आधीची पत्नी प्रिन्सेस डायनाला पाकिस्तानात आपल्या प्रियकरासोबत राहायचे होते. अशा अफवा नेहमीच येत असतात की डायना पाकिस्तानमध्ये कुणाच्यातरी प्रेमात होती पण कोणालाही याची पुष्टी कधीच करता आली नाही. आता ब्रिटिश तज्ज्ञ इव्ह पोलार्डने दिलेल्या माहितीवर आधारित डॉक्युमेंटरी फिल्ममध्ये यासंदर्भात दावे केले गेले आहेत.

‘पाकिस्तानी डॉक्टर सोबत लग्न करून तिथेच राहण्याची इच्छा होती’

मेल ऑनलाइन च्या वृत्तानुसार, ‘डायना: हर लास्ट समर’ मध्ये पोलार्डने दावा केला आहे की प्रिन्सेस ऑफ वेल्स जेमीमा गोल्डस्मिथ सोबत पाकिस्तानमध्ये स्थायिक होण्याबाबत चर्चा करायची. गोल्डस्मिथ इमरान खानची पत्नी होती आणि ती लाहोरमध्ये राहत होती. पोलार्ड म्हणाले हा विचार कुणीच करू शकत नाही की डायनाला पाकिस्तानमध्ये एका डॉक्टरशी लग्न करून तिथे राहायचे होते.

‘मीडिया अटेंशन ने तोडले नाते’

1997 मध्ये डायना पाकिस्तान गेली तेव्हा ती डॉ. हजनत खानच्या आई-वडिलांना गुप्तपणे भेटली, पण माध्यमांच्या अटेंशनमुळे त्यांचे संबंध तुटले. हजनत या नात्यास खाजगी ठेवू इच्छित होते. दोघांनाही ओळखत असलेले मित्र त्यांना गुप्तपणे भेटण्यात मदत करीत असत. माजी पत्रकार जेनी बाँडच्या मते याबाबतीत चर्चा होत होती की डायना कोणत्यातरी हार्ट सर्जनच्या प्रेमात होती पण कोणालाही खरं काय ते माहित नव्हतं. दुसरे पत्रकार रिचर्ड के च्या म्हणण्यानुसार डायना हजनतकडे अत्यंत आकर्षित झाली होती.

‘नंतरही ती हजनतबद्दल विचारत राहिली’

रिचर्ड म्हणाले की, मीडियाच्या दबावामुळे हे दोघे वेगळे झाले आणि ब्रेकअपनंतर तिने हेरड्सचे मालक अल-फायद आणि आपल्या मुलाबरोबर वेळ घालवायला सुरुवात केली. डायनाचे बटलर राहिलेले पॉल बरल यांच्या म्हणण्यानुसार, या दरम्यान डायनाचे प्रयत्न असायचे की मीडियाने तिचे फोटो काढावेत जेणेकरुन हजनत पाहू शकेल. त्यानंतर ती पॉलला विचारायची की त्याने हजनतला पाहिले आहे का? त्याचवेळी डायनाचे नवीन आयुष्य पाहून हजनत खूप अस्वस्थ होते.