1000 रुपयाच्या नोटेबबत RBI नं सांगितलं ‘वास्तव’, जाणून घ्या Fact

नवी दिल्ली : वृत्त संस्था – जर तुम्ही सुद्धा ही बातमी ऐकली असेल की, लवकरच तुमच्या हातात एक हजार रूपयांची नोटा येणार आहे, तर तुमच्यासाठी सुद्धा ही बातमी महत्वाची आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने 1000 रुपयांची नवी नोट जारी केलेली नाही. सोशल मीडियावर सध्या अशी अफवा पसरली आहे की, 1000 रुपयांची नवी नोट जारी करण्यात आली आहे. हे वृत्त चूकीचे असल्याचे पीआयबी फॅक्ट चेकने म्हटले आहे.

सोशल मीडियावर अफवा पसरत आहे की, आरबीआयने 1000 रुपयाची नवी नोट जारी केली आहे. या नोटेचा फोटोही शेयर केला जात आहे. याबाबत माहिती घेतली असता 1000 रुपयांच्या नोटेबाबत सोशल मीडियावर पसरत असलेली बातमी आणि फोटो दोन्ही बनावट आहे. आरबीआयने 1000 रुपयांच्या नोटेबाबत कोणतीही अधिसूचना जारी केलेली नाही.

PIB Fact Check केंद्र सरकारची पॉलिसी/स्कीम्स/विभाग/मंत्रालयांबाबत चूकीची सूचना, माहिती रोखण्याचे काम करते. सरकारशी संबंधित बातमी खरी आहे की, खोटी हे जाणून घेण्यासाठी पीआयबी फॅक्ट चेकची मदत घेता येते. संशयास्पद बातमीचा स्क्रीनशॉट, ट्विट, फेसबुक पोस्ट या व्हॉट्सअ‍ॅप नंबर 918799711259 वर पाठवता येते. किंवा [email protected] वर मेल करता येईल.