अलर्ट ! सोशल मीडियावर ‘कोरोना’ व्हायरसबद्दल पसरत असलेल्या अफवांना लागणार ‘ब्रेक’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात दहशत पसरली आहे. आतापर्यंत चीनमध्ये सुमारे 12,000 लोकांना याचा संसर्ग झाला असून इतर 25 देशांमध्ये व प्रदेशात 130 हून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. त्याचवेळी चीनमध्ये आतापर्यंत 400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यादरम्यान या कोरोना व्हायरस संदर्भात सोशल मीडियावर खोट्या अफवा पसरवल्या जात आहेत. ज्यामुळे सोशल मीडिया नेटवर्क आता सतर्क झाले आहे.

फेसबुकने प्रसिद्ध केलेल्या ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले की, मोठ्या जागतिक आरोग्य संस्था आणि स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी या व्हायरससंदर्भात केलेले खोटे दावे चिन्हांकित करून ते काढून टाकले जातील. कारण, अशा पोस्टमुळे चुकीची माहिती आणि लोकांचे शारीरिक नुकसान होईल. लोकांना व्हायरस नष्ट करण्यासाठी ब्लीच पिण्याचा सल्ला देण्यात येत आहे, असे फेसबुकने यावेळी संगितले. जागतिक आरोग्य संघटनेने आता कोरोना विषाणूस सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली असून ब्रिटनमधील दोन लोकांमध्ये या विषाणूची सकारात्मक चाचणी झाली आहे.

जागतिक सार्वजनिक आरोग्य समुदाय लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी कार्यरत असलेल्याचे अनेक मार्गांनी फेसबुक समर्थन करत आहे. विशेषतः या विषाणूबद्दल चुकीची माहिती आणि हानिकारक पोस्ट्स येत असल्यास फेसबुक मर्यादित ठेवण्यासाठी आणि लोकांना उपयुक्त माहितीशी जोडण्यासाठी फेसबुक कार्यरत आहे. सोशल मीडिया नेटवर्क अशा पोस्ट काढून टाकण्यासाठी त्यांच्या विद्यमान धोरणांचा विस्तार म्हणून हे करीत आहेत, ज्यामुळे शारीरिक हानी होऊ शकते. फेसबुकसोबतच इंस्टाग्रामवर चुकीची माहिती पसरवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या हॅशटॅग ब्लॉकवर बंदी घालण्याचे काम केले जात आहे आणि सोशल मीडियावर अशा जास्तीत जास्त पोस्ट्स काढून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे.