एकतरी छावणी चालवून दाखवा, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे सरकारला आव्हान

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – राज्य सरकारने छावणी चालकांसाठी अतिशय जाचक अटी व शर्ती घातल्या आहेत. सर्व नियमांची अंमलबजावणी करायची असेल, तर संस्थाचालकांनी छावण्या चालवायच्या तरी कशा ? शेतकऱ्यांबाबत सरकार इतका अविश्वास दाखवत आहे. सरकारने एकतरी छावणी चालवून दाखवावी, असे खुले आव्हान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे.

याबाबत बोलताना आ. थोरात म्हणाले की, जनावरांना टॅगींग करून मोजणी रोज केली जात आहे. छावणीचालकांनी नियोजन पहायचे की रोज टॅगिंग करायचे. सरकारच्या वतीने तहसीलदार, तलाठी, ग्रामसेवक यांचे दिवसभरात दौरे असतात. मग ते काय करतात. रोज जनावरे मोजायला सरकारचा शेतक-यांवर एव्हढा विश्वास नाही का. सर्व अहवाल देवूनही सरकारने छावणीचालकांचे पैसे दिले नाहीत, उलट दंड आकारले आहेत. ही कोणती पद्धत आहे. सरकारने
एक तरी आदर्श छावणी चालवून दाखवावी. त्यात तहसीलदार, तलाठी यांच्याकडेनियोजन असावे. मग त्यांना कळेल, छावण्या कशा चालविल्या जातात

टँकरवरून दुरून पाणी आणण्याचा खर्च वाढतो.
सरकार मात्र जुन्याच दराने टँकरचे पैसे देणार आहे. त्यामुळे छावणीचालकांवर अन्याय होईल. आचारसंहिता असल्याने विरोधकांना काही बोलता येत नाही. त्याचा गैरफायदा सरकारने घेतला. आचारसंहितेच्या नावाखाली मजुरांना गरज असताना रोजगार हमीची कामे सुरू केली नाहीत. या सरकारने आचारसंहिता एन्जॉय केली, असेही थोरात म्हणाले.

Loading...
You might also like