न्यायदान आणि राज्यकारभार हा मराठीतुनच चालावा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – न्यायदान आणि राज्यकारभार हा मराठीतुनच चालावा याकरिता छत्रपती शिवाजी महाराज आग्रही होते. मध्य युगीन काळात आधुनिक विचार करणारे ते एकमेव राजे होते असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ.सदानंद मोरे यांनी येथे केले.
पुणे बार असोसिएशनतर्फे शिवजयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ.मोरे “मध्ययुगातील आधुनिक राजा” या विषयावर बोलत होते. सदर व्याख्यानामध्ये डॉ.मोरे यांनी शिवाजी महाराज व त्यांची स्वराज्याची संकल्पना तसेच शिवाजी महाराजांच्या काळातील न्यायव्यवस्था यावर विस्तृत माहिती दिली. डॉ. मोरे यांनी शिवाजी महाराज व त्याकाळातील मराठी भाषेचा विकास यावर माहिती दिली.

शिवाजी महाराज यांनी मध्ययुगातील आधुनिक राजा म्हणून कसा ठसा उमटवला याबाबत डॉ. मोरे यांनी विस्तृतपणे माहिती सांगितली. सदर कार्यक्रमामध्ये पुणे बार असोसिएशचे सदस्य ऍड.धवल दहिदुले यांनी पोवाडा सादर केला. तसेच सदर कार्यक्रमात ऍड.अरुण गाडेकर यांनी लिहिलेल्या “रानफुल” या पुस्तकाचे लोकार्पण डॉ.मोरे यांच्या हस्ते झाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बारचे अध्यक्ष अ‍ॅड. श्रीकांत आगस्ते यांनी केले.उपाध्यक्ष अ‍ॅड. रवि लाढाणे यांनी स्वागत केले, अ‍ॅड. रूपेश कलाटे यांनी डॉ. मोरे यांचा परिचय करून दिला. खजिनदार अ‍ॅड.सचिनकुमार गेलडा यांनी सर्वांचे आभार मानले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेक्रेटरी अ‍ॅड. केदार शिंदे यांनी केले.