धक्कादायक ! मुंबई मॅरेथॉनमध्ये 3 धावपट्टूंना Heart Attack, एकाचा जागीच मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशविदेशातील ५५ हजारांहून अधिक धावपटूचा सहभाग असलेल्या मुंबई मॅरेथॉनमध्ये धावत असताना ६४ वर्षाच्या धावपटूला ह्दयविकाराचा झटका आल्याने त्यात त्यांचा मृत्यु झाला. गजानन माजलकर असे या धावपटूचे नाव आहे.

या मॅरेथॉनमध्ये धावताना ७ जणांना ह्दयविकाराचा त्रास झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून हिरवा झेंडा दाखवून हौशी धावपटूच्या फुल मॅरेथॉनला सुरुवात करुन दिली. मुंबई मॅरेथॉनमधील विविध शर्यतीमध्ये वेगवेगळ्या गटातील तरुण तरुणी ज्येष्ठ नागरिकांनी भाग घेतला होता. ज्येष्ठांची शर्यत सुरु झाल्यानंतर गजानन माजलकरही या शर्यतीत धावत होते. धावत असताना अचानक त्यांना छातीत दुखु लागले. त्यामुळे त्यांना तातडीने जवळच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. परंतु, तोपर्यंत त्यांना ह्दयविकाराचा झटका येऊन त्यातच त्यांचे निधन झाले.

या मॅरेथॉनमध्ये धावताना ७ जणांना त्रास झाला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like