‘माझी फाईलच पुढे जात नाही’ : आंतराष्ट्रीय धावपटू कविता राऊत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांनी नुकतीच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आहे. शालेय शिक्षण आणि क्रिडा विभागाकडून माझ्या कामात अडचणी आणल्या जात आहेत. माझी फाईल तेथून पुढे जात नाही, अशी तक्रारच त्यांनी राज्यपालाकडे केली आहे.

राऊत म्हणाल्या की, 2014 मध्ये मी वर्ग 1 च्या नोकरीसाठी अर्ज केला होता. तेंव्हापासून मी सातत्याने संबधित अधिकारी, विभागाशी याचा पाठपुरावा घेत होते. माझ्यानंतर ज्यांनी अर्ज केला होता. त्यांच्या नियुक्त्या केल्या गेल्या. मला मात्र अद्यापही न्याय मिळालेला नाही. 2018 मध्ये जी यादी निघाली त्यातही माझे नाव नव्हते. मला ग्रामीण भागातील खेळांडूसाठी काम करण्याची इच्छा आहे. त्यांचा विचार करून मी वर्ग 1 साठी अर्ज केला होता. मात्र अद्यापही नोकरी मिळाली नाही.

राऊत यांनी यावेळी शालेय शिक्षण आणि क्रिडा विभागावर गंभीर आरोप केले आहेत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना भेटणे हा माझ्यासाठी शेवटचा पर्याय होता, असे त्या म्हणाल्या.

You might also like