सकाळी रनिंग करत असाल तर घ्या ही काळजी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अनेकजण फिटनेससाठी वॉकिंग, जॉगिंग किंवा रनिंग करतात. परंतु, यासाठी योग्य ती माहिती घेणे आवश्यक आहे. योग्य प्रकारे रनिंग, जॉगिंग न केल्यास शरीराला फायदे होण्याऐवजी त्रास होऊ शकतो. यासाठी धावताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.

सकाळी धावण्यास सुरूवात करण्यापूर्वी वार्मअप करावे. कुठलीही एक्सरसाईज करण्यापूर्वी ही काळजी घेतली पाहिजे. यामुळे धावण्याआधी वॉर्मअप गरजेचे आहे. वॉर्मअप म्हणून स्टेचेज आणि लंजेस करा. वॉर्मअप केल्याने पाय, हिप्स आणि बट्स मजबुत होतात. पळताना त्रास होत नाही. तुम्ही धावताना बोलू शकत नसाल तर तुम्ही फार वेगाने धावत आहात. त्यामुळे जास्त वेगाने धावणे टाळावे. यास टॉक टेस्ट असे म्हणतात. जास्त वेगाने धावल्यास इजा होऊ शकते.

मसल्सद्वारे पोषक तत्वांना अब्जॉर्ब करण्याची क्षमता वर्कआउट करण्याच्या ४५ मिनिटांच्या आतमध्ये अधिक असते. त्यामुळे रनिंगनंतर काही तरी खाल्ले पाहिजे. आहारामध्ये प्रोटीनची अधिक असावेत. प्रोटीन्समुळे मसल्स रिपेअर होण्यास मदत होते. चुकीचे रनिंग शूज वापरल्यानही इजा होते. त्यामुळे योग्यप्रकारचे रनिंग शूज वापरले पाहिजेत. काही वेळाने शूज बदलावेत. शूजमधील कुशन खराब झाल्याने त्रास होऊ शकतो.

Loading...
You might also like