फिटनेससाठी धावणे गरजेचे पण किती धावायचं ‘हे’ जाणून घ्या !

पोलीसनामा ऑनलाईन टीम : फिटनेस राखण्यासाठी आणि स्टॅमिना वाढवण्याकरता धावणं हा उत्तम व्यायामप्रकार समजला जातो. एक मैल धावल्यावर शंभर कॅलरी बर्न होतात. कॅलरी जाळणारा सर्वात वेगवान व्यायाम अशी धावण्याच्या व्यायामाची ओळख आहे. धावण्यामुळे वेगळीच ऊर्जा शरीरात संचारते. पण धावन वजन कमी करण्यासाठी आणि फिट राहण्यासाठी फायदेशीर ठरते हे सर्वांनाच माहिती आहे. पण अनेक जणांना हे माहिती नसते की, किती धावावं, चला तर मग जाणून घेऊया. यासंदर्भात एक रिसर्च करण्यात आला. त्यात म्हटलं होत की, दररोज ५ ते १० मिनिटे धावल्यावर तुमचा हृदयाचा वेगवेगळ्या आजारांपासून बचाव होतो. धावणाऱ्या लोकांमध्ये हार्टमुळे होणाऱ्या मृत्युदरात २८ टक्के कमतरता पाहायला मिळाली.

चांगल्या आरोग्यासाठी धावणे किती महत्वाचं आहे, हे या रिसर्चमधून स्पष्ट झालं. मात्र, त्यासोबत किती धावलं पाहिजे हे सुद्धा जाणून घेणं तेवढंच गरजेचं आहे. कारण धावण्याचा अति वेग तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यावेजी बिघडवू पण शकते. या रिसर्चमध्ये लोकांना सांगण्यात आलं की, आठवड्यातून तुम्ही कमीत कमीत ४.५ तास धावणं गरजेचं आहे. तसेच आणखी एका रिसर्चमध्ये सांगण्यात आलं की, रोज ४० ते ६० मिनिटे धावल्याने संपूर्ण शरीराची एक्सरसाइज होते. म्हणून नियमितपणे धावावे.

धावण्याचे शरिरासाठी होणारे फायदे
१. बौद्धिक आरोग्य
उतार वयात वाढत्या वयानुसार आपली बौद्धिक क्षमता आणि आरोग्य कमी होऊ लागते. अल्झायमर्ससारखा आजार तर फार कॉमन आहे. त्यामुळे मेंदूच्या पेशींची क्षमता घटते. धावल्यामुळे अल्झायमर्स जरी बरा होत नसला तरी पेंशीचे घट रोखण्यामध्ये त्यामुळे खूप मदत होते.

२. तणावमुक्ती
आपल्या धकाधकीच्या आयुष्यात स्ट्रेस वाढला आहे. धावल्यामुळे नोरेपाईनफ्राईनची मात्रा वाढते. हे संयुग आपल्या मेंदू व शरीराला एकताळ्यात ठेवते. धावल्यामुळे आपला आत्मविश्वास व आत्मसन्मान वाढतो.

३. मूड सुधारतो
तुमचा मूड जर खराब असेल तर लगेच घराबाहेर पडा आणि पळा. संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की, धावल्यामुळे आपला मुड सुधारतो.

४. झोप चांगली येते
आपल्याला किमान ७-८ तासांची झोप गरजेची असते. धावल्यामुळे आपल्या झोपेचे वेळापत्रक सुरळीत होते. नियमित धावल्यामुळे चांगली झोप लागते.