Running Health Benefits | वजन कमी करण्यासाठी दररोज किती किलोमीटर करावी रनिंग?, आजारांपासून सुद्धा होईल बचाव; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Running Health Benefits | वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी लोक नवनवीन मार्ग अवलंबतात. काही लोक वजन कमी करण्यासाठी जिममध्ये (Gym) जाऊन तासन्तास घाम गाळतात, तर मोठ्या संख्येने लोक उद्यानांमध्ये व्यायाम (Exercise) करतात. धावणे हा एक उत्तम व्यायाम आहे, जो आपल्या शरीराला रोगांपासून वाचवतो. तुम्ही सकाळी रस्त्यावर बाहेर पडाल तेव्हा तुम्हाला अनेक लोक धावताना दिसतील. वजन कमी करण्यासाठी धावणे हा एक उत्तम मार्ग आहे. दररोज काही किलोमीटर धावून तुम्ही स्वतःला तंदुरुस्त ठेवू शकता आणि सहज वजन कमी करू शकता. दररोज किती धावल्याने वजन कमी होईल हे जाणून घेण्याचा प्रयत्न बरेच लोक करतात. याबद्दल सविस्तर जाणून घ्या (Running Health Benefits).

 

रनिंग बर्न करते कॅलरी (Running Burns Calories)
हेल्थलाइनच्या रिपोर्टनुसार, धावण्याने मोठ्या प्रमाणात कॅलरीज बर्न होतात. व्यायामापेक्षा धावणे वजन कमी करण्यासाठी अधिक प्रभावी आहे. धावताना, आपल्या शरीराच्या बहुतेक स्नायूंची जास्तीत जास्त शक्ती वापरली जाते. एका संशोधनात असे समोर आले आहे की, 1600 मीटर धावल्याने चालण्यापेक्षा 35 कॅलरीज जास्त जळतात. जर तुम्ही दररोज 8-10 किलोमीटर धावत असाल तर तुम्ही चालण्यापेक्षा 350 कॅलरीज जास्त जाळू शकता. हार्वर्ड युनिव्हर्सिटीने केलेल्या संशोधनात असे आढळून आले की, 10 किमी प्रतितास वेगाने 30 मिनिटे धावल्याने सुमारे 372 कॅलरीज बर्न होतात. जर तुम्ही दररोज असे धावलात तर तुमचे वजन खूप लवकर कमी होऊ शकते. (Running Health Benefits)

 

बेली फॅट कमी करण्यासाठी प्रभावी (Belly Fat)
आत्तापर्यंतच्या अनेक अभ्यासातून असे समोर आले आहे की, पोटाची चरबी आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे.
यामुळे हृदयविकार, टाईप 2 मधुमेहासह (Heart Disease, Type 2 Diabetes) अनेक आजारांचा धोका वाढतो.
धावण्यासारखा हाय एरोबिक व्यायाम पोटाची चरबी कमी करण्यासाठी खूप प्रभावी ठरू शकतो.
विशेष म्हणजे जर तुम्ही धावत असाल तर तुम्हाला तुमच्या आहारात बदल करण्याचीही गरज भासणार नाही आणि तुम्ही फिट राहाल.
मात्र, यासाठी तुम्हाला वेगवान धावणे आवश्यक आहे. सायकलिंगने सुद्धा पोटाची चरबीही कमी होऊ शकते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Running Health Benefits | running helps you lose weight it burns more calories than most exercises weight loss tips

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Cholesterol | ‘या’ हिरव्या भाजीपासून तयार करा स्पेशल Herbal Tea, हाय कोलेस्ट्रॉलपासून होईल सुटका

’गंदी बात’ फेम Gehana Vasisth ने बाथरूममध्ये दिल्या न्यूड पोज, का म्हटले – ’…थकले आता’

Turmeric Side Effects | कोणत्या लोकांनी करावे हळदीचे कम सेवन, जाणून घ्या एका दिवसात किती प्रमाण योग्य