Rupa Dutta Arrested | पॉकेटमारीच्या आरोपावरून अभिनेत्री रूपा दत्ताला अटक, पर्समधून मिळाली तब्बल ‘इतकी’ चोरीची रक्कम

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बंगाली फिल्म इंडस्ट्रीमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री रूपा दत्ता (Rupa Dutta Arrested) प्रेक्षकांच्या चांगलीच चर्चेत असते. मात्र रूपाबद्दल एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तिला पोलिसांनी अटक (Rupa Dutta Arrested) केलं असल्याचं म्हटलं जातंय, त्यामुळे तिच्या चाहत्यांसाठी ही बातमी अत्यंत धक्कादायक आहे.

 

अभिनेत्री रुपा दत्ता (Rupa Dutta) कोलकत्तामधील ‘आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळावा’मध्ये उपस्थित होती. त्यामध्ये तिनं पाकीट चोरी केलं असल्याचं म्हटलं जातंय. माहितीनुसार मागील शनिवारी एका महिलेला पोलिसांनी कचऱ्यामध्ये बॅग फेकताना बघितल. अचानक अशी चांगली बॅग कचऱ्यामध्ये पाहून, पोलिसांनी शंका व्यक्त केली. त्यामुळे तिची तपासणी केली असता, पोलिसांना हैराण करणारी गोष्ट समोर आली.

 

कोलकत्ता पोलीसांनी (Kolkata Police) रूपाला तपासणीसाठी प्रश्न विचारले. त्याचबरोबर त्याबद्दल त्या बॅगबद्दल सुद्धा विचारलं. माहितीनुसार पोलिसांना रूपा दत्ताकडून 75 हजार रुपये मिळाले आहेत. तिची तपासणी केली असता, तिनं चोरी केल्याची कबुली दिली. तसेच पुढे ती म्हणाली की ती वेगवेगळ्या इवेंट्स आणि गर्दीच्या ठिकाणी जाऊन लोकांची पर्स चोरते.

 

दरम्यान, रूपा दत्ता ने काही वर्षापूर्वी अनुराग कश्यपबद्दल (Anurag Kashyap) सेक्सुअल हैरेसमेंटचा (Sexual Harassment) गंभीर आरोप केला होता.

 

Web Title :- Rupa Dutta Arrested | actress rupa dutta arrested in kolkata on the charges of pickpocketing

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा