Rupali Chakankar-EVM Machine Pooja | रुपाली चाकणकरांची ईव्हीएम पूजा नडली; मतदान केंद्र अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Rupali Chakankar-EVM Machine Pooja | रूपाली चाकणकर यांनी ईव्हीएम मशीनची पूजा केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. निवडणूक अधिकारी यांनी रुपाली चाकणकरांविरोधात सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये (Sinhagad Road Police Station) तक्रार दिली होती. या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, चाकणकर यांनी मतदानाच्या दिवशी (दि. ७ मे) वडगाव धायरी परिसरातील नारायणराव सणस मतदान केंद्रावर मतदान सुरू होण्यापूर्वी ईव्हीएम मशीनची पूजा केली होती.(Rupali Chakankar-EVM Machine Pooja)

मतदान केंद्रात जाऊन पूजा करणे, हे निवडणूक आयोगाच्या नियमात बसत नसल्याने त्याच मतदान केंद्राच्या मतदान अधिकाऱ्याने याप्रकरणी तक्रार दिली होती. याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांच्या सूचनेनुसार सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर द्विवेदी यांनी या मतदान केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात शिस्तभंगाची कारवाई करावी, असा अहवाल डॉ. दिवसे यांच्याकडे पाठवला होता. त्यानंतर दिवसे यांनी केंद्रातील मतदान केंद्राध्यक्ष, ३ मतदान अधिकारी व एका कर्मचाऱ्याला नोटीस बजावली आहे. त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर त्यावर निर्णय घेण्यात, येईल असे सांगण्यात येत आहे.

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खडकवासला विधानसभा मतदारसंघातील एका मतदान केंदार्त ईव्हीएम मशीनची पूजा केल्याने मतदान केंद्रातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी अधिकारी डॉ. सुहास दिवसे (Dr. Suhas Diwase) यांनी नोटिसा बजावल्या आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MNS-BJP-Mahayuti | महायुतीत चौथा वाटेकरी, मनसेने महायुतीकडे ‘या’ 20 जागा मागितल्या? ; जाणून घ्या

RSS On BJP About Support Of Ajit Pawar | पुरेसे बहुमत असताना अजितदादांना सोबत का घेतलं? RSS ने भाजपाला सुनावलं

Sassoon Hospital | ससूनच्या डॉक्टरांची खाजगी मेडिकलवाल्यांशी ‘दुकानदारी’; ससून रुग्णालयाचा कारभार पुन्हा चव्हाट्यावर, कारवाई होणार? (Video)

Maha Vikas Aghadi | अखेर मविआचा तिढा सुटला; विधानपरिषद निवडणुकीतील दोन उमेदवारांचा अर्ज मागे