Rupali Chakankar | आयकर विभागाच्या कारवाईचा हिशोब व्याजासकट चुकता केला जाईल, रुपाली चाकणकर यांचा ‘घणाघात’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आयकर विभागाने उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निकटवर्तीयांसह त्यांच्या बहिणींच्या घरावर काल छापा टाकला. यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपवर (BJP) निशाणा साधला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी या कारवाईनंतर भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. सरकारी यंत्रणांचा अयोग्य वापर करत एखाद्याचं राजकीय आयुष्य उध्वस्त करण्याचा प्रयत्न भाजपला काही नवीन नाही ते त्यांच्या रक्तातच आहे. पण या व्यक्तीवरचा राग म्हणून त्यांच्या कुटुंबाला, बहिणींना त्रास देण्याची ही कुठली पद्धत आहे, अशा शब्दांत रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी घणाघात केला आहे. तसेच देशातील आणि राज्यातील राजकारणाची पातळी ज्या पद्धतीने खाली घसरली आहे ते धक्कादायक असल्याचेही त्यांनी म्हटले.

 

 

रुपाली चाकणकर पुढे म्हणाल्या, काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या घरांवर, ऑफिसमध्ये आयकर विभागाच्या छापे (Income tax department raid) टाकले होते. त्याचा निषेध नोंदवित अजित पवार या भाजपच्या कृतीची परतफेड करतील. एखादी व्यक्ती आपल्या यंत्रणेला जुमानत नाही, आपल्या पक्षाला जुमानत नाही तेंव्हा त्याच्या कुटुंबातील महिलांना टार्गेट करुन त्या व्यक्तीला हार मानायला लावणार असाल तर लक्षात ठेवा की ते अजित पवार आहेत, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

अजित पवार कधीच हारणार नाहीत. माणूस स्वत:वर आलेल्या कोणत्याही संकटांशी सामना करेल मात्र,
यामध्ये विनाकारण घरातील महिलांना मधे ओढून यातून राजकारण (Politics) करत असेल तर दादा ते व्याजासकट
याचा हिशोब चुकता करतील असंही रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी म्हटले आहे.

Web Title :- Rupali Chakankar | it raids on ajit pawar family, Income tax department’s action will be paid with interest, says Rupali Chakankar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Tata Group | रतन टाटा यांच्या 2 कंपन्यांनी करून दिली जबरदस्त ‘कमाई’, जाणून घ्या कसा झाला गुंतवणुकदारांचा फायदा

Pune Crime | खेड-शिवापूर टोल नाक्याजवळ लक्झरी बसमधून 6 किलो चरस जप्त, राजगड पोलिसांकडून तरुणाला एकाला अटक

Pune News | पुण्याच्या मोहम्मदवाडीत भरदिवसा झाडे उखडून टाकण्याचा प्रकार; समाजकंटकांविरुद्ध कारवाईची नागरिकांची मागणी