Rupali Chakankar | ‘हे संस्कार… माफी मागा नाहीतर…’, रुपाली चाकणकरांचा गुलाबराव पाटलांना इशारा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आपल्या भाषण आणि वेगवेगळ्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे जळगावचे (Jalgaon) शिवसेनेचे नेते (Shiv Sena leader) आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) हे आता आपल्याच विधानामुळे चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यांच्या या विधानाची दखल राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी घेतली आहे. एक लोकप्रतिनिधी म्हणून असं विधान करणे हे निषेधार्ह आहे, त्यांनी याबद्दल जाहीर माफी मागावी (apologize) अन्यथा कारवाईला (legal action) सामोरं जावं, असा इशारा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी दिला आहे.

 

गुलाबराव पाटील (Rupali Chakankar) यांनी आपल्या मतदारसंघातील रस्ते हे हेमा मालिनीच्या (Hema Malini) गालासारखे आहेत, असं विधान करुन वाद ओढावून घेतला आहे. त्यांच्या विधानाची दखल राज्य महिला आयोगाच्या (State Women’s Commission) अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी घेतली आहे.

एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून गुलाबराव पाटील यांनी असं विधान करणे हे निषेधार्ह आहे.
आपल्या मतदारसंघातील रस्त्याची तुलना त्यांनी एका महिला खासदाराच्या गालासोबत केली, या विधानाबाबत जाहीर माफी मागा,
अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल, असा इशारा रुपाली चाकणकर यांनी दिला आहे.
तसेच एका वस्तूची तुलना महिलेच्या रंग रुपासोबत करणे, ही संस्कार आणि संस्कृती अत्यंत नीचपातळीची आहे.
आपण महिलांना दुय्यम वागणूक देता हे चुकीचं आहे.
पाटील यांनी माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल, असे चाकणकर यांनी म्हटले आहे.

 

काय म्हणाले गुलाबराव पाटील?
गुलाबराव पाटील यांनी बोदवड नगरपंचायत (Bodvad Nagar Panchayat) निवडणुकीसाठी आयोजित प्रचार सभेत भाषण करताना
आपल्या मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे केल्याचे म्हटले आहे.
एवढच नाही तर हेमा मालिनीच्या गालासारखे रस्ते दिसले नाहीत तर राजीनामा देईन असेही त्यांनी म्हटले आहे.

 

Web Title :- Rupali Chakankar | maharashtra state women’s commission president rupali chakankar warns gulabrao patil not to apologize or face legal action

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

India Post Payments Bank -IPPB | 1 जानेवारीपासून ‘या’ बँकेत 10,000 रुपयांपेक्षा जास्त जमा केल्यास लागेल चार्ज, जाणून घ्या किती पैसे होतील खर्च

National Pension System (NPS) | ‘प्रायव्हेट नोकरी’मध्ये सुद्धा मिळवू शकता पेन्शन, निवृत्तीनंतर होणार नाही पैशांची अडचण; जाणून घ्या

Desecration of Shivaji Maharaj Statue | शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना ! कानडी पोलिसांची मराठी भाषिकांविरोधात दडपशाही, मध्यरात्री 27 जणांना अटक, 61 जणांवर FIR