Rupali Chakankar | किरण मानेंना मालिकेतून का काढले? खुलासा करावा; रुपाली चाकणकरांचे निर्मात्यांना पत्र

0
145
Rupali Chakankar what happened when the government changed i will not leave the post of chairperson of the womens commission said rupali chakankar clearly
file photo

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेते किरण माने (Actor Kiran Mane) यांनी लिहिलेल्या फेसबुक पोस्ट आणि त्यानंतर त्यांना मालिकेतून काढणं हे प्रकरण सतत नवं वळण घेत आहे. आता राज्य महिला आयोगाच्या (Maharashtra State Women’s Commission) अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी या प्रकरणात उडी घेतली आहे. किरण माने यांच्या पत्नी ललीता माने (Lalita Mane) यांनी महिला आयोगाकडे याबाबत तक्रार केली आहे. त्यानंतर रुपाली चाकणकर यांनी मालिकेच्या प्रॉडक्शन हाऊसला (Production House) पत्र लिहून किरण माने यांना मालिकेतून का काढलं याचा जाब विचारला आहे. या सगळ्याचे स्पष्टीकरण द्या, असं चाकणकर (Rupali Chakankar) यांनी म्हटलं आहे.

 

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी पॅनोरामा इंटरटेनमेंट (Panorama Entertainment) या निर्मिती संस्थेच्या पदाधिकारी सुझान घई (Suzan Ghai) यांना पत्र लिहिले आहे.
यात त्यांनी किरण माने यांच्या पत्नी ललीता माने यांच्या तक्रारीचा उल्लेख केला आहे.
पत्रात म्हटले आहे की, किरण माने यांच्या पत्नी ललीता माने यांनी आपल्याला या सगळ्या प्रकाराचा मानसिक त्रास होत असल्याचे म्हटलंय.
सोबतच आर्थिक चणचणीला सामोरं जावं लागत असल्याचे म्हटलंय.
या सगळ्याची दखल घेत या निर्मिती संस्थेने किरण माने यांना मालिकेतून काढलं याचं स्पष्टीकरण द्यावं, असं रुपाली चाकरणकर यांनी पत्रात म्हटले आहे.

कलावंतांनी वैचारिक राजकीय भूमिका मांडल्यामुळे त्यांना मालिकेतून काढून टाकणे ही बाब कलाकाराच्या वैचारिक व्यक्तिस्वातंत्र्यावर हल्ला करणारी
असल्यामुळे याबाबतीचा लेखी खुलासा राज्य महिला आयोगास सादर करण्याचे निर्देश या मालिकेच्या निर्मात्यांना दिले आहेत.

 

 

Web Title :- Rupali Chakankar | maharashtra state women’s commission president rupali chakankars letter to the producers regarding removal of kiran mane

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nana Patole | ‘माझ्या मतदारसंघातील मोदी नावाच्या स्थानिक गुंडाबाबत बोललो; नाना पटोले यांचे स्पष्टीकरण

 

Horoscope (Rashifal) | 18 जानेवारीला सूर्याप्रमाणे चमकणार ‘या’ राशींचे भाग्य, वाचा मेषपासून मीन राशीपर्यंतची स्थिती

 

Coronavirus in Maharashtra | रुग्णसंख्येत मोठी घट! राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 31,111 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Jumbo Oxygen Plant in Mumbai | मुंबईत जम्बो ऑक्सिजन प्लांटची उभारणी ! दिवसाला 1500 ऑक्सिजन सिलिंडरची निर्मिती होणार

 

Pimpri Corona Updates | पिंपरी चिंचवडमध्ये शहरामध्ये ‘कोरोना’च्या रुग्णसंख्येचा तीन लाखांचा टप्पा पार, गेल्या 24 तासात 2365 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी