Rupali Chakankar | मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात सर्वाधिक महिला अत्याचाराच्या तक्रारी; एकाचवेळी 174 महिलांनी नोंदवल्या तक्रारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Rupali Chakankar | मागील काही महिन्यांत ‘महाराष्ट्र स्टोरी’ असे डिवतच राज्यातील महिला अत्याचाराच्या वाढत्या समस्येवर ताशेरे ओढले जात आहे. यामध्ये आता राज्य महिला आयोगाने (State Commission for Women) एक धक्कादायक बाब समोर आणली आहे. राज्यातील सर्वाधिक महिला अत्याचाराच्या तक्रारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यातून (Thane District) आल्याची माहिती महिला आयोगाकडून देण्यात आली आहे. (Rupali Chakankar)

 

महिला आयोगातर्फे अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्या उपस्थितीत ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत (Women Commission) ठाणे जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला. या आढाव्यादरम्यान चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली जनसुनावणीचे (Public Hearing) आयोजन करण्यात आले. या जनसुनावणीचा सुयोग्य वापर करून घेत ठाण्यातील एकूण 174 महिलांनी आपल्या तक्रारी नोंदवल्या असून, ठाण्यातून आलेल्या तक्रारी राज्यातील सर्वाधिक तक्रारी असल्याचे मत अध्यक्ष चाकणकरांनी मांडले आहे.

 

 

महिलांवरचे अत्याचार थांबवण्यासाठी आयोजित करण्यात आलेली सदर जनसुनावणी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पार पडली. यावेळी समुपदेशक (Counsellors), पोलीस (Police), विधी अधिकारी (Legal Officers) या ५ लोकांचे पॅनल तयार करून सुनावणी करण्यात आली. एकाच वेळी एकुण तब्बल 174 तक्रारींवर सुनावणी घेण्यात आली.

या सुनावणीवर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या की, महिला आयोगाच्या वतीने ठाणे शहर आणि ग्रामीण भागाची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जनसुनावणी आयोजित करण्यात आली होती. या जनसुनावणीमध्ये एकूण 174 तक्रारदार आपल्या तक्रारी घेऊन आल्या होत्या. यामध्ये सर्वाधिक 116 कौटुंबिक समस्या (Family Problems) असल्याच्या तक्रारी होत्या. सामाजिक समस्येच्या (Social Problems) 18, मालमत्ता (Property) संबधीत 09, कामाच्या ठिकाणी होणारे अत्याचार 05 आणि इतर 26 अशा एकूण 174 तक्रारी आल्या होत्या. राज्यभर फिरून आढाव घेणारा हा माझा 24 वा जिल्हा असून, या 24 जिल्ह्यात आतापर्यंतच्या सर्वाधिक तक्रारी ठाणे जिल्ह्यातून आल्याचं चाकणकर यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे, यात कौटुंबिक समस्यांच्या सर्वाधिक तक्रारी असल्याचं देखील चाकणकर म्हणाल्या.

 

 

पुढे म्हणाल्या की, जनसुनावणीवेळी आलेल्या तक्रारीचं जागच्या जागी निरसन करण्यासाठी आणि त्यांना न्याय देण्यासाठी महिला आयोगाच्या वतीने प्रयत्न केले जात आहे. आज झालेल्या जनसुनावणीवेळी 5 लोकांचे पॅनल (Panel) तयार करून एकाच वेळी एकुण 174 तक्रारींवर सुनावणी घेण्यात आली. तसेच यावेळी वेगवेगळ्या विभागाचा देखील आढावा घेण्यात आला आल्याचे चाकणकरांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी महिलांसाठी असलेल्या खास टोल फ्री नंबरची (Toll Free Number) माहिती दिली.
राज्यभरातील वाढत्या महिला अत्याचाराच्या (Women’s Oppression) घटनांवर तातडीने उपाययोजना
करण्यासाठी टोल फ्री क्रमांकाची सोय करण्यात आली आहे. यामध्ये 112, 110 आणि 191 टोल क्रमांकांचा समावेश आहे.
मात्र याबाबत मोठ्याप्रमाणावर जनजागृती झालेली नाही. तर महिला अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी पोलीस,
प्रशासनासह नागरिक म्हणून आपली सर्वांची देखील तेवढीच जबाबदारी असल्याचे मत चाकणकर यांनी व्यक्त केले आहे.

 

 

Web Title :  Rupali Chakankar | Most complaints of women abuse in Chief Minister’s station;
Complaints registered by 174 women simultaneously

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा