Rupali Chakankar । ‘बायको जात चोरते, नवरा राजदंड पळवतो’; ‘या’ दांपत्याला राष्ट्रवादीचा खोचक टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Rupali Chakankar | मागील दोन दिवसापूर्वी पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) पार पडले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले. विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातल्याने भाजपच्या 12 आमदारांना निलंबन करण्यात आलं. त्याचवेळी सभागृहात आमदार रवी राणा यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. तर जागेवरून उठून तालिका अध्यक्षांसमोरील राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. या कृत्यावरून राष्ट्रवादीच्या (NCP) महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) आणि त्यांची पत्नी अपक्ष खासदार नवनीत राणा-कौर (Navneet Rana Kaur) यांना टोला लगावला आहे.

 

 

बायको जात चोरते, तर नवरा राजदंड पळवतो, हे दोघं बंटी-बबली असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादीच्या (NCP) महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी केलीय. विधानसभेत घातलेल्या गोंधळामुळे आणि तालिका अध्यक्षासमोर जाऊन राजदंड उचलणे अशा प्रकारामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) आमदार रवी राणा आणि त्यांची पत्नी खासदार नवनीत राणा-कौर यांना टोमणा लगावला आहे.

दरम्यान,ओबीसी आरक्षणाच्या (OBC reservation) मुद्द्यावरून. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण पुन्हा मिळवून देण्यासाठी आवश्यक असणारा इम्पिरिकल डेटा केंद्राने द्यावा, याबाबतच्या ठरावावेळी गदारोळ निर्माण झाला होता. विधानसभा तालिका अध्यक्ष भास्कर जाधव (Table President Bhaskar Jadhav) यांच्यासमोरील माईकही ओढण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांनी केला. याच काळात रवी राणा यांनी राजदंड पळवण्याचा प्रयत्न केल्यानंतर तालिका अध्यक्षांनी मार्शल बोलावून त्यांना सभागृहातून बाहेर काढले होते. या मुद्द्यावरून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे.

तसेच, काही दिवसांपूर्वी जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे चर्चेत आलेल्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana Kaur) यांना देखील राष्ट्रवादी काँग्रेसने लक्ष्य केलं आहे. कौर यांचं जात प्रमाणपत्र अवैध असल्याचं मुंबई हाय कोर्टानं सांगितलं होतं. त्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यावेळी सुप्रीम कोर्टानं हाय कोर्टाच्या आदेशाला स्थगिती दिली.

हे देखील वाचा

Pune Crime News | ‘या’ मोठया आर्थिक घोटाळयात पहिल्यांदाच भाजपच्या विधानपरिषदेच्या आमदाराचं आलं प्रकाशझोतात, पुणे पोलिस घेताहेत युध्दपातळीवर शोध

Anti Corruption Bureau Pune | दौंड तालुक्यातील यवतमध्ये तलाठयास 30 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शननं पकडलं

Monsoon Update । राज्यात मान्सून परतला; आगामी 5 दिवस पुण्यासह अनेक जिल्ह्यात पावसाची रिपरिप, हवामान खात्याचा अंदाज

BJP MLA Nitesh Rane । आदित्य ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य; नीतेश राणेंनी ट्वीट करत शब्द घेतले मागे

Modi Cabinet Expansion | केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर यांच्यासह 12 मंत्र्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्विकारला

Anil Deshmukh | बडतर्फ सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे वसुलीची रक्कम देशमुखांच्या PA ला दयायचा; ईडीचा दावा

Gold Rate Today । 9,000 रुपयांनी स्वस्त झालेल्या सोन्याच्या किंमतीत पुन्हा वाढ, जाणून घ्या आजचे दर

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Rupali Chakankar | ncp criticizes mp navneet kaur rana and mla ravi rana

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update