Rupali Chakankar | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! रूपाली चाकणकर यांची ‘या’ पदावर केली नियुक्ती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी अखेर रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने नियुक्तीचा आदेश जारी केला आहे. रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) महिला प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi government) सत्तेत आल्यापासून महिला आयोगाचं (State Women Commission) अध्यक्षपद रिक्त होतं. अखेर रुपाली चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
आज राज्य सरकारकडून याबद्दल अधिकृत घोषणा करण्यात आली.
तसेच याबद्दल अधिसूचना (Notification) काढण्यात आली आहे.
रुपाली चाकणकर या उद्या महिला आयोगाचा पदभार स्वीकारणार आहेत, अशी माहिती मिळाली आहे.

चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकल्यानंतर रुपाली चाकणकर यांना बढती मिळाली होती त्यांनी या संधीच सोनं करत वेळोवेळी भाजपवर (BJP) चांगलाच हल्लाबोल केला. भाजपकडून चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकर याच्यात अनेकवेळा शाब्दिक युद्ध झाल्याचे पाहायला मिळाले.
नुकतेच रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी निवड झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर चित्रा वाघ यांचा चांगलाच तिळपापड झाला.
चित्रा वाघ यांनी आपला संताप ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केला होता.

दरम्यान, राज्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. त्यातच राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद गेल्या दीड वर्षापासून रिक्त होतं.
त्यामुळे आघाडी सरकारला मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरं जावं लागत होतं.
या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेत रुपाली चाकणकर यांची अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

 

Web Title : Rupali Chakankar | ncp leader rupali chakankar was elected as the chairperson of the womens commission official announcement from the maharashtra government today

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

EPFO-EDLI Scheme | ईपीएफओ मेंबर्सला ईडीएलआय योजनेची ‘ही’ सर्व वैशिष्ट्य माहिती असणं अत्यंत गरजेचं , जाणून घ्या

Pune Crime | सराईत गुन्हेगार पृथ्वीराज कांबळेवर MPDA अंतर्गत कारवाई, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची 44 वी कारवाई

CM Uddhav Thackeray | मुंबईतील अनधिकृत बांधकामांबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे कठोर, दिले ‘हे’ स्पष्ट आदेश