Rupali Chakankar on Navneet Rana | रुपाली चाकणकरांचा नवनीत राणांवर जोरदार निशाणा; म्हणाल्या – ‘शांत महाराष्ट्राला अशांत करण्याची ही विकृत मनोवृत्ती’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Rupali Chakankar on Navneet Rana | अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांच्याकडून महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना लक्ष्य केलं जात असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘शांत महाराष्ट्राला अशांत करण्याची ही विकृत मनोवृत्ती असल्याचं,’ चाकणकर यांनी म्हटलं आहे. चाकणकर यांनी आज पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात (Nationalist Congress Party offices) माध्यमांशी संवाद साधला. (Rupali Chakankar on Navneet Rana)

 

”कोरोना महामारी मधून महाराष्ट्र बाहेर पडत आहे. महागाई, बेरोजगारी, शेतकरी, कामगारांचे प्रश्न असे मोठे प्रश्न राज्यासमोर आहेत. यासाठी हा महाराष्ट्र एकत्र येतो, लढतो आणि या लढाईच्या विरोधात जिंकतो देखील महाराष्ट्राला सावरण्यासाठी विरोधकांनी भूमिका घेतली पाहिजे. या महाराष्ट्रात वाद कसा निर्माण होईल, याकडे काहींचं फार लक्ष असते. त्या लोकांचे कोणते व्हिडिओ, कोणते फोटो आहेत हे मला माझ्या आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाचे वाटत नाही.” असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.

 

पुढे रुपाली चाकणकर म्हणाल्या, ”होता तेव्हा असाच पुढाकार घेऊन केंद्राकडे मदतीसाठी मागणी केली असती,
तर ती मागणी महाराष्ट्राच्या लोकांच्या निश्चित लक्षात राहिली असती.
पण सध्या जे काही चाललं आहे ते शांत महाराष्ट्राला अशांत करायचं ही विकृत मनोवृत्ती वाटत असल्याचं,” त्यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- ncp leader rupali chakankar aims at mp navneet rana

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Kangana Ranaut Killer Look | अत्यंत रिवालिंग ड्रेस घालून कंगना रानौतनं चाहत्यांना लावलं वेड, व्हायरल फोटोनं इंटरनेटचं वाढवलं तापमान…!

 

Pune Crime | पुण्यातील मोठ्या जुगार अड्डयावर गुन्हे शाखेचा छापा; जागा मालक बाळासाहेब दांगट याच्याविरुद्ध FIR (व्हिडीओ)

 

Foods For Kidney Disease | किडनीचे ’सुरक्षा कवच’ आहेत ‘हे’ 5 फूड, विषारी पदार्थ बाहेर काढून बनवतात मजबूत