Rupali Chakankar | महिलांना शौचालय वापरासाठी 7 रूपये; युवकाची ट्विटद्वारे तक्रार; रुपाली चाकणकरांनी घेतली तात्काळ दखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Rupali Chakankar | परप्रांतीय पुरुष कर्मचारी शौचालयात येणाऱ्या प्रत्येक महिलेकडे शौचालय वापरासाठी जबरदस्ती पैसे घेत असून असभ्य भाषेत बोलत असल्याबाबतची तक्रार एका युवकाने ट्विटच्या माध्यमातून केली. या तक्रारीची तात्काळ दखल राज्य महिला आयोगाच्या (maharashtra women’s commission) अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी घेतली आहे.

 

तेजस पडवळ (Tejas Padwal) असं त्या ट्विटरवरुन तक्रार करणाऱ्या युवकाचे नाव आहे. तेजसने आपल्या ट्विटमध्ये मुख्यमंत्रीसह, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar), परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab), गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse-Patil) यांना मेन्शन केलं आहे. या युवकाच्या ट्विट तक्रारीची चाकणकर यांनी तात्काळ दखल घेतली. त्याचबरोबर आजच दखल घेतली जाईल, असं प्रत्युत्तर देखील चाकणकर यांनी दिलं.

 

पुणे येथील (Pune) आंबेगाव तालुक्याीतल मंचर एस.टी स्टॅंड येथील सुलभ शौचालयात असलेला परप्रांतीय पुरुष कर्मचारी शौचालायात येणाऱ्या प्रत्येक महिलेकडे शौचालय वापरासाठी जबरदस्ती पैसे घेत असून असभ्य भाषेत बोलत आहे. सदरच्या शौचालायात महिला कर्मचारी नाही. संबंधित पुरुष कर्मचारी महिलाकडून शौचालय वापरासाठी 7 रुपये घेतो, पैसे देण्यास नकार दिल्यास महिलांना असभ्य भाषेत ओरडतो. तसेच त्यांना शौचालय वापरास मनाई करतो. तसेच मागे जाण्याचा प्रयत्न करतो, अशी तक्रार तेजस नामक ट्विटर युजर्सने केले. यावरुन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी या तक्रारीची दखल घेतल्याने काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

 

Web Title :- Rupali Chakankar | rs 7 toilet use women pune ambegaon bus stand quick notice tweet complaint maharashtra state women’s commission president rupali chakankar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

…म्हणून वाहतूक पोलिसाला भेटला मास्टर ब्लास्टर Sachin Tendulkar, मुंबई पोलिसांनी केले ‘हे’ विशेष ट्विट

Indian Bison Pune | भरकटून पुण्याच्या कोथरूड परिसरात आलेल्या रानगव्याच्या मृत्यूची मुंबई हाय कोर्टाने घेतली दखल

Jaya Bachchan | सून ऐश्वर्या रायची ED ने केली चौकशी ! जया बच्चन यांनी भाजपला दिला शाप; म्हणाल्या – ‘वाईट दिवस लवकरच येतील’

Sayaka Kanda Dies | हॉटेलच्या 22व्या मजल्यावरून पडून अभिनेत्री सायाका कांडा हिचा मृत्यू, पोलिसांना आत्महत्या केल्याचा संशय

ST Workers Strike | एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात फूट?, महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कर्मचारी संघटनेच्या अजय गुजर यांच्या माघार घेण्याने संपकरी आक्रमक