Rupali Chakankar | ‘प्रविण दरेकर, महिलांची माफी मागा अन्यथा महिलांचा अपमान करणाऱ्यांचे थोबाड आणि गाल रंगवू शकतो’ (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Rupali Chakankar | भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (BJP Leader Pravin Darekar) यांनी राष्ट्रवादीवर टीका करताना आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. पुणे जिल्ह्यातील एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादीच्या (NCP) धोरणांवरून टीका करताना दरेकर यांनी वादग्रस्त भाषेचा वापर केला. यामुळे आता वाद निर्माण झाला आहे. या वादग्रस्त विधानावरुन आता राष्ट्रवादीच्या (NCP) महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी दरेकरांना प्रत्युत्तर दिले आहे.

प्रविण दरेकर यांंच्या वादग्रस्त विधानानंतर रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
त्या म्हणाल्या की, आम्ही थोबाड आणि गाल रंगवू शकतो, असा शब्दात एक इशारा त्यांनी दरेकरांना दिला आहे.
शिरूर येथे आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त जय मल्हार क्रांती संघटनेने आय़ोजित केलेल्या राज्यव्यापी कार्यकर्ता मेळाव्यात प्रविण दरेकर (Pravin Darekar) बोलत होते.
त्यावेळी त्यांनी लावणी कलाकार सुरेखा पुणेकर (Surekha Punekar) राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार आहेत.
या प्रवेशावर नाव न घेता, दरेकरांनी राष्ट्रवादी पक्षावर वादग्रस्त शब्दात टिपण्णी केली होती.
यावर चाकणकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) म्हणाल्या की, प्रविण दरेकर, महिलांची माफी मागा अन्यथा आम्हीही महिलांचा अपमान करणाऱ्यांचे थोबाड आणि गाल रंगवू शकतो याची जाणीव ठेवा.
असा इशारा चाकणकर यांनी दरेकरांना दिला आहे.
प्रवीण दरेकर आपण वरिष्ठांच्या सभागृहातील विरोधीपक्ष नेते आहात.
हे वरिष्ठ आणि ज्येष्ठांचं सभागृह आहे. पण, तुमच्या वैचारिकत्ता आणि अभ्यासाशी दूर दूर काही संबंध नाही, असा टोला देखील रुपाली चाकणकर यांनी प्रविण दरेकर यांना लगावला आहे.

 

काय म्हणाले दरेकर?

‘गरीबांकडे बघण्यासाठी राष्ट्रवादीला वेळ नाही. राष्ट्रवादी हा रंगलेल्या गालांचा मुका घेणारा पक्ष आहे,’ असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना दरेकर म्हणाले की, ‘राष्ट्रवादी हा सुभेदारांचा, कारखानदारांचा, बँकेवाल्यांचा पक्ष आहे.
मात्र, भाजप हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे.
राष्ट्रवादीतील नेतृत्वाकडे बघा…या पक्षात कुठल्या गरीब माणसाला आमदार, खासदार होता आलं नाही. भाजपच्या आमदारांची आणि खासदारांची यादी बघा..आमच्या पक्षात संघर्ष करणाऱ्यांना स्थान आहे,’
असं ते म्हणाले आहेत.

 

Web Title : Rupali Chakankar | rupali chakankar slam bjp pravin darekar ncp party

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Ranveer Singh and Deepika Padukone | रणवीर, दीपिका होणार अलिबागकर; ‘या’ कामासाठी मोजले तब्बल 22 कोटी रूपये

Pravin Darekar | NCP वर टीका करताना प्रवीण दरेकरांची जीभ घसरली, म्हणाले – ‘राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष’ (व्हिडीओ)

Maharashtra Government | महाराष्ट्र शासनाच्या 29 विभागांमध्ये तब्बल दोन लाख 193 जागा रिक्त