Rupali Chakankar | रुपाली चाकणकर ‘या’ मतदारसंघातून निवडणूकीसाठी इच्छूक, म्हणाल्या- ‘2019 ला अर्ज दाखल केला पण…’ (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभेची निवडणूक (Lok Sabha Elections 2024) अवघ्या एक वर्षावर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीनंतर विधानसभेची निवडणूक (Legislative Assembly Election) होणार आहे. या दोन्ही निवडणुकीसाठी राज्यातील सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणी सुरु केली आहे. महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi), युतीत (Alliance) जागावाटपाबद्दल चर्चा सुरु आहे. तर इच्छूक उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघात तयारी सुरु केल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या (State Commission for Women) अध्यक्ष रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनीही 2024 ला निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले आहे. रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) पुण्यातील खडकवासला विधानसभा मतदार संघातून (Khadakwasla Assembly Constituency) निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहेत.

 

 

रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) म्हणाल्या, 2019 ला मी खडकवासला विधानसभा मतदारसंघातून इच्छूक उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. माझ्यासोबत सहा ते सात इच्छूक उमेदवारांनी अर्ज केला होता. ज्या दिवशी आमच्या मुलाखती होणार होत्या त्याच दिवशी मुलाखतीच्या दोन तास अगोदर मला राज्याच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केल्याचं पत्र मिळालं. त्यामुळे माझी मुलाखत होऊ शकली नाही.

 

रुपाली चाकणकर पुढे म्हणाल्या, पक्षाने विचारणा केली होती. परंतु, पक्षाच्या पडत्या काळामध्ये मला प्रदेशाध्यक्ष पद मिळालं होतं. महाराष्ट्र पिंजून काढत महिला संघटना उभी करणं ही मोठी जबाबदारी माझ्यावर होती. अशावेळी मतदारसंघात थांबून प्रचार करणं किंवा यंत्रणा राबवणं मला शक्य नव्हतं. त्यामुळे मी नकार दिला होता.

 

2024 ला उमेदवारी मागणार

मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कर्यकर्ती म्हणून काम करत आहे. त्यामुळे मी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)
आणि वरिष्ठ नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे उमेदवारी मागणार आहे.
मी खडकवासला मतदार संघातून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील आहे. 2019 ला मीच उमेदवारी नको म्हणून सांगितले होते.
मात्र येणाऱ्या निवडणकीत मी उमेदवारी मागणार असल्याचे रुपाली चाकणकर यांनी सांगितले.

 

 

Web Title :  Rupali Chakankar | rupali chakankar will contest assembly elections in 2024 from khadakwasla constituency

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा