‘ते’ सत्तेचे ‘लोणी’ चाखायला गेले : राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष चाकणकर

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – जे नेते दुसऱ्या पक्षात जात आहेत. ते सत्तेचे लोणी चाखायला जात आहेत. त्यांना कुठल्याही पक्षाशी निष्ठा नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नूतन महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर आज केला.

चाकणकर या सध्या उत्तर महाराष्ट्राच्या दौर्‍यावर आहेत. आज त्यांनी नगरमध्ये महिला पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या की, पक्षात सक्षम कार्यकर्ते-नेते आहेत. जी जागा रिकामी झाली, ती 12 तासांत भरली. जे नेते दुसऱ्या पक्षात जात आहेत, ते सत्तेचे लोणी चाखायला जात आहेत. कोणाच्या जाण्याने पक्ष संपत नाही. याउलट पक्षाला नवीन नेतृत्व मिळते, असेही त्यांनी सांगितले.

आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पक्ष पुन्हा एकदा भरारी घेईल आणि पुन्हा पक्षाला वैभव प्राप्त होईल. राज्यात पक्षाची ताकद निश्चित वाढलेली असेल, असेही चाकणकर यांनी सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like