TV शोसाठी ‘रूपाली’नं ‘तळपत्या’ उन्हात केली डान्स प्रॅक्टीस, भाजले पाय

पोलीसनामा ऑनलाइन – अ‍ॅक्ट्रेस रूपाली गांगुली स्टार प्लसवरील शो अनुपमामध्ये दिसणार आहे. शोबद्दल चांगलंच वातावरण तयार केलं जाताना दिसत आहे. शोचे अनेक प्रोमो समोर आले आहेत. आपली मालिका अनुपमासाठी रूपाली खूप मेहनत घेताना दिसत आहे. या मालिकेत तिनं एका साध्या महिलेची भूमिका साकारली होती. ती एक कथ्थक डान्सर आहे. तिच्या या टॅलेंटला कोणीच महत्त्व देत नाही.

तळपत्या उन्हात केली डान्स प्रॅक्टीस

आपल्या भूमिकेसाठी रूपालीनं अहमदाबादच्या सूर्य मंदिरात तळपत्या उन्हात गरम फरशीवर डान्स केला. तिचे पायही पोळले आहेत. याबाबत बोलताना रूपाली म्हणाली, “हे ऐकायला थोडं विचित्र वाटेल, परंतु मला अनवाणी राहयला जास्त आवडतं. त्यामुळे सूर्य मंदिरात अनवाणी डान्स करणंही मला जास्त आवडलं. माझे पाय पूर्णपणे पोळले आहेत. परंतु मी खूप आनंद घेतला. त्यामुळे त्रासाची अजिबात जाणीव झाली नाही. मी सलग शॉट देत गेले. मला आशा आहे की, प्रेक्षकांनाही माझा परफॉर्मंस आवडेल.”

ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेचे मेकर्स राजन शाही अनुपमा ही मालिका घेऊन येत आहेत. या मालिकेत रूपाली गांगुली प्रमुख भूमिकेत आहे. मालिकेत एका कमी शिकलेल्या आणि आपली ओळख बनवण्यासाठी झटणाऱ्या अशा महिलेची स्टोरी दाखवण्यात आली आहे. ही मालिका म्हणजे बंगाली शो श्रीमोई (Sreemoyee) चा रिमेक आहे.