Rupali Patil | भाजप आ. सुनील कांबळेंची ‘ती’ क्लिप व्हायरल झाल्यानंतर ‘मनसे’च्या रूपाली पाटील संतापल्या, म्हणाल्या – ‘सुधरा रे सुधरा, लायकी नाही तुमची लोकप्रतिनिधी व्हायची’ (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील भाजपचे पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे (pune cantonment vidhan sabha constituency) भाजपचे आमदार सुनील कांबळे (BJP MLA Sunil Kamble) यांनी महापालिकेच्या एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याला अर्वाच्च भाषेत केलेली शिवीगाळ केल्याचे समोर आलं. भाजप आमदाराची महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ करतानाची मोबाईलवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल (Audio clip goes viral) झाली त्यामुळे राजकीय खळबळ उडाली असून भाजपवर सगळीकडून टीका होऊ लागली आहे. मनसेच्या (MNS) नेत्या रुपाली पाटील (Rupali Patil) यांनी या प्रकरणावरुन इशारा दिला आहे. तुम्हाला पुण्यातील महिला वर्ग सूट देणार नसल्याचा इशारा रुपाली पाटील (Rupali Patil) यांनी दिला आहे.

 

 

रुपाली पाटील (Rupali Patil) म्हणाल्या, ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. अशा लोकप्रतिनिधींना मनसे अजिबात सोडणार नाही. सुनिल कांबळे तुम्ही आमदारांच्या खुर्चीवर बसण्याच्या लायकीचे नाही. तुम्हाला पुण्यातील महिला वर्ग सूट देणार नसल्याचा इशारा रुपाली पाटील यांनी दिला आहे.

तुम्ही बिनलायकीचे आमदार
तुम्ही भंगार बिनलायकीचे आमदार आहात. तुमच्या घरी माता, बहिणी असूनही या महिलेला तुम्ही आई बहिणीवरुन शिवाय देताय. ती ऑडिओ क्लिप ऐकायलाही नको वाटतंय. अशी तुमची जीभ घसरली कशी काय असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केलाय.

 

सगळ्या लोकप्रतिनिधींनी भान ठेवा

महिलेनं फक्त कांबळेंना वरिष्ठांशी बोला एवढचं सागितलं. तर अर्वाच्च भाषेत शिव्या देण्याचं कारण काय.
पुण्याचे महापौर (Pune Mayor), भाजप नेते, यांना विनंती आहे की, त्यांनी त्वरित कांबळे यांच्यावर पक्षाने कारवाई करावी.
पुण्यात सगळ्या लोकप्रतिनिधींनी भान ठेवा. कि कोणत्याही महिलेशी अर्वाच्च भाषेत बोलणं महागात पडेल.
हि महिला कर्मचाऱ्यांशी बोलण्याची भाषा नाही. अशांना सूट देणार नसल्याचा इशारा रुपाली पाटील यांनी दिला आहे.

Web Titel :- Rupali Patil | BJP MLA sunil kamble does not deserve sit mlas chair mns rupali patil

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | कन्हैयाकुमारकडे काँग्रेस मोठी जबाबदारी सोपवणार, काँग्रेस प्रवेशाचे पुणे कनेक्शन

Gulab Cyclone | किनारपट्टीवर ‘गुलाब चक्रीवादळा’चा रुद्रावतार, आगामी 3 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा (व्हिडिओ)

Post Office | विना जोखीम 124 महिन्यात ‘डबल’ करा आपले पैसे, सुरक्षेची 100% खात्री, जाणून घ्या काय आहे योजना?