Rupali Patil On Chandrakant Patil | राष्ट्रवादीच्या रुपाली पाटलांचा खोचक सल्ला; म्हणाल्या – ‘चंद्रकांत पाटलांनी हिमालयात जाऊन डोक्याला तेल लावावं आणि…’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Rupali Patil On Chandrakant Patil | राज्यसभा निवडणुकीच्या (Rajya Sabha Elections 2022) पार्श्वभूमीवर राज्यात वातावरण अधिक तापलं असल्याचं दिसत आहे. यामध्ये आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) आणि भाजप (BJP) यांच्यात मोठे दावे – प्रतिदावे केले जात आहेत. दरम्यान पुण्यात देखील राजकीय वळण लागलं आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून (Pune NCP) खोचक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. अशातच राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे – पाटील (Rupali Patil) यांनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला आहे.

 

रुपाली पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांना तेलाची बाटली, साबण, ब्रश आणि गोळा केलेला निधी कुरिअरने पाठवला आहे. त्याचबरोबर, त्या म्हणाल्या, “राज्यात कुठेही निवडणूक लावा. मी जर निवडून आलो नाही, तर हिमालयात जाईन, असं विधान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकात पाटील यांनी केलं होतं. मात्र कोल्हापूर येथील पोटनिवडणूक चंद्रकांत पाटील लढले नाहीत. पण तिथे भाजपाच्या उमेदवाराला पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे त्यांनी वास्तविक पाहता हिमालयात जायला पाहिजे होते. मात्र ते काही गेले नाहीत.”

पुढे त्या म्हणाल्या, “त्याच दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी चुलीत जा, मसणात जा, अशा पद्धतीचे विधान केले. त्यामुळे त्यांनी राजकीय संस्कृती संपविण्याचे काम केले आहे. त्या पार्श्वभूमीवर आज आम्ही चंद्रकांत पाटलांच्या वाढदिवशी हिमालयात जाण्यासाठी गोळा केलेला निधी आणि तेलाची बाटली, साबण, ब्रश, टूथपेस्ट कुरिअरने पाठवत आहोत,” असं त्या म्हणाल्या.

 

दरम्यान, “चंद्रकांत पाटलांनी हिमालयात गेल्यावर डोक्याला तेल लावावे आणि ध्यान करावे.
यामुळे त्यांच्या मनाला आणि डोक्याला निश्चित शांती मिळेल. तसेच त्यांच्या संस्कारामध्येही वाढ होईल.
त्यामुळे दिलेला शब्द चंद्रकांत पाटील यांनी पाळला पाहिजे आणि हिमालयात जायला पाहिजे,” असाही सल्ला रुपाली पाटील यांनी दिला.

 

 

Web Title :- Rupali Patil On Chandrakant Patil | ncp rupali patil on bjp leader chandrakant patil marathi news

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा