Rupali Patil On Chandrasekhar Bawankule | राष्ट्रवादीच्या रूपाली पाटील यांचा भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंवर निशाणा, म्हणाल्या -’ज्याला तिकीट मिळालं नाही तो…’

पुणे : Rupali Patil On Chandrasekhar Bawankule | ज्यांना स्वत:ला विधानसभेची उमेदवारी मिळाली नाही ते बारामती जिंकणार का, अशा शेलक्या शब्दात राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्या रुपाली पाटील यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना डिवचले (Rupali Patil On Chandrasekhar Bawankule) आहे. भाजपाचे (BJP) मिशन बारामती आजपासून सुरू झाले असून बारामती लोकसभा मतदारसंघ (Baramati Lok Sabha Constituency) जिंकण्यासाठी भाजपाचे नेते कामाला लागले आहे. बावनकुळे देखील आज बारामती दौर्‍यावर आले होते. त्यांनी पवार कुटुंबाच्या प्रचाराचा नारळ ज्या कन्हेरीच्या हनुमान मंदिरात फुटतो त्याच मंदिरात दर्शन घेऊन काटेवाडीत बुथ क्रमांक 218 चा आढावा घेतला. यावरून रुपाली पाटील यांनी बानकुळे यांची सोशल मीडियावर (Social Media) खिल्ली उडवली आहे.

संघटन बांधणी आणि केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांच्या दौर्‍याच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी आज बावनकुळे बारामतीत आहेत. येथील बैठकीत बावनकुळे म्हणाले, जेव्हा संघटन मजबूत होते तेव्हा संघर्ष करण्याची ताकद निर्माण होते, त्यानंतर मात्र चांगले-चांगले गड उद्ध्वस्त होतात, हा देशाचा इतिहास आहे. गड हा कोणाचा नसतो, जनतेने तो बनविलेला असतो त्यामुळे जनताच देश हितासाठी बदल करते. (Rupali Patil On Chandrasekhar Bawankule)

पवारांच्या बालेकिल्ल्यात जाऊन बावकुळे यांनी आव्हान दिल्याने रुपाली पाटील यांनी एक फेसबुक पोस्ट (Facebook Post) केली. ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, यांना पक्षात उमेदवारी मिळेना आणि बारामती जिंकणार म्हणे…

2024 लोकसभा निवडणुकीत (2024 Lok Sabha Elections) महाराष्ट्रातील प्रमुख मतदारसंघ जिंकण्यासाठी
भाजपाने आतापासून तयारी (BJP Baramati Mission) सुरु केली आहे.
त्यापैकी बारामती एक आहे. भाजपने लोकसभेसाठी ’मिशन 45’ सुरू केले आहे.
राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे (Shivsena) मतदारसंघ हिसकावण्याची ही भाजपाची तयारी आहे.
त्यानिमित्त 22 ते 24 सप्टेंबरदरम्यान देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) सुद्धा बारामतीत येणार आहेत.
त्याची पूर्वतयारी करण्यासाठी बावनकुळे यांनी बारामतीमध्ये विशेष बैठक घेतली.

Web Title :-  Rupali Patil On Chandrasekhar Bawankule | ncp leader rupali patil slam chandrashekhar bawankule over bjp mission baramati

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Gulabrao Patil | ‘आजपर्यंत एक नेता म्हणून इज्जत ठेवली, नाहीतर…’ गुलाबराव पाटलांचा आदित्य ठाकरेंना थेट इशारा (व्हिडीओ)

Rashmi Bagal | रश्मी बागल सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात जाणार? त्यांच्यावर होता उध्दव ठाकरेंचा ‘विश्वास’

CM Eknath Shinde – MLA Sanjay Shirsat | मुख्यमंत्री निवास ’वर्षा’वरील स्नेहभोजनाला एकनाथ शिंदे गटाचे औरंगाबादचे आ. संजय शिरसाट जाणार नाहीत; चर्चांना उधाण